Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याने एकनाथ शिंदे अस्वस्थ, दिल्लीत काय ठरलं?

Eknath Shinde Meet Narendra Modi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचनाक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Roshan More

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी रात्री दिल्ली दौऱ्यावर गेले. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिदेंच्या या दौऱ्यामागे आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत स्वबळाचा दिलेला नारा कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या नाऱ्याने ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.

अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याआधीच शिंदेंनी दिल्ली धाव घेतल्याने वेगळ्याच चर्चा सुरू आहेत. महायुती झाली तरी देखील एकनाथ शिंदेंच्या वाट्याला कमी जागा येण्याची भीती आहे. त्यामुळे शिंदेंनी दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. मात्र, दिल्लीच्या दौऱ्यात नेमके त्यांना कुठले आश्वासन देण्यात आले याची माहिती समोर येऊ शकली नाही.

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपचे पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. शिंदेंच्या ठाण्यात देखील भाजपचे पदाधिकारी स्वबळावर लढण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, मुंबई, ठाणे या महापालिकांमध्ये स्वतंत्र लढून त्याचा फायदा ठाकरे बंधूंना होऊ नये म्हणून या महापालिकांमध्ये युती आणि अन्यत्र स्वबळावर असा भाजपची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे काय म्हणाले?

दिल्ली दौऱ्यावर असताना शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये कुठेही बेबनाव नाही. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याची निवडणूक लढण्याची इच्छा मात्र युतीमध्ये कार्यकर्ते हे वरिष्ठांचे आदेश पाळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. एनडीएमधील सर्व घटक पक्ष हे विचाराने एकत्र आलेले असून ही आघाडी अशीच भक्कम राहावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT