Diwali Teacher Story : वेतन रखडलं, दिवाळी अंधारात; शिक्षकानं गाठलं शिक्षणमंत्र्यांचं निवासस्थान अन्...

Ahilyanagar Teacher Tells Dada Bhuse About Delayed Salary : अहिल्यानगर मधील विशेष शिक्षकांनं, व्यथा, आर्थिक अडचणी अन् शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजन, याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिली.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar education news : अहिल्यानगर जिल्ह्यातील 128 विशेष शिक्षकांना गेले तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबांची दिवाळी अंधारात गेली आहे. शिक्षकांच्या या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विशेष शिक्षक उमेश शिंदे यांनी थेट शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या प्रश्‍नावर लक्ष वेधले.

उमेश शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील विशेष शिक्षकांची व्यथा, आर्थिक अडचणी, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिली. यानंतर मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी परिस्थिती गांभीर्याने दखल घेत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.

उमेश शिंदे यांनी राज्यात सध्या 2 हजार 984 विशेष शिक्षक (Teacher) अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगतिले. हे शिक्षक कोणतीही अपेक्षा न ठेवता दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक गुणवान विद्यार्थी घडले.

परंतु दुर्दैवाने अद्यापपर्यंत त्यांना ना कौतुकाची थाप मिळाली, ना कोणताही सन्मान मिळाल्याचे स्पष्ट केले, तर शिक्षणमंत्र्यांना तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर हेलन केलर आणि लुईस ब्रेल पुरस्कारांच्या नावाने विशेष शिक्षक व उत्कृष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा प्रस्ताव सादर केला.

Dada Bhuse
Uttar Bharatiya Ekta Manch : ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखी एक झटका; 25 वर्षांपासून बरोबर असलेल्या उत्तर भारतीय एकता मंचने साथ सोडली

या मागणीवर दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण सचिवांना पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. या भेटीवेळी सामाजिक कार्यकर्ते पिंटू अहिरे, अमोल पाटील, विकी बडगे, सुनील अहिरे, राहुल पाटील यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने वेतन विलंबाचा निषेध नोंदवला आणि शिक्षकांच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Dada Bhuse
Government Officer: सरकारी अधिकारी नेहमी हिरव्या शाईचा पेन का वापरतात?

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी, सरकारी नोकरी ही राष्ट्रसेवेची संधी आहे. शिक्षक हे समाजाच्या घडणीतील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या हक्काच्या वेतनात विलंब होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने नियोजन करून शिक्षकांना न्याय देण्याबाबत शिक्षण सचिवांना निर्देश दिले. तसंच कार्यवाही पूर्ण होईपर्यंत लक्ष ठेवा, अशा सूचना देखील दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com