Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis  sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा भर सभागृहात इशारा, म्हणाले 'कोणीही असो...'; सदस्यांचे टाळ्या वाजवून प्रोत्साहन

Eknath Shinde warns Rahul Solapurkar Prashant Kortkar : एकनाथ शिंदे यांनी शायरीमधून उद्धव ठाकरेंना टोला लगावला फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिंमत आपकी बोलने की ना होती, असे म्हटले

Roshan More

Eknath Shinde News : राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या अभिषणावर उपमुख्यमंत्री विधान परिषदेमध्ये बोलले. त्यांनी आपल्या भाषाणातून महिला आणि महापुरुषांची बदमानी करणाऱ्यांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही. अबू आझम असो, प्रशांत कोरटकर किंवा राहुल सोलापूरकर यांना देखील सोडणार नाही. शिंदेंच्या इशाऱ्यानंतर विधान परिषदेतील सदस्यांनी टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले.

विरोधकांना टोला लगावत एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्योग बाहेर गेलेत याच्यात विरोधकांची कॅसेट अडकली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आमची दमदार सुरुवात झाली आहे. दुप्पट वेगाने आम्ही काम करतोय. स्वारगेट प्रकरण, महिला अत्याचार प्रकरणा विषयी बोलताना लाडक्या बहिणींवर नराधम अन्याय करत आहेत. त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही. बदलापूरला जी कारवाई झाली ती सर्वांनी पहिली होती, असे इशाराही शिंदेंनी दिला.

भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून राजकारण करण्यात येत आहे. मात्र, त्यांनी ते जे बोलले होते त्याचे स्पष्टीकरण दिले आहे, असे शिंदें यांनी सांगत मराठी अमराठी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तसेच अबू आझमी विरोधात कारवाई करण्याची आपण सर्वप्रथम मागणी केल्याचे सांगितले.

सब्र का फल मिठा...

शिंदे म्हणाले, परकीय गुंतवणुकीवरून विरोधक टीका करत आहेत पण तब्बल 15 कोटींची गुंतवणूक 15 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आलीय. सब्र का फल मिठा होता है. दीड ट्रीलियन गुंतवणूक फक्त एमएमआर रिजनमध्ये आहे. मेट्रोला, कारशेडला विरोध केला. पण, 15 ते 20 लाख लोकं मेट्रोने प्रवास करणार आहेत, असे शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदे यांनी शायरीमधून उद्धव ठाकरेंना टोला लगावला फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिंमत आपकी बोलने की ना होती, असे म्हटले तसेच वडिलांची छत्रछाया सोडून शत्रूशी हात मिळवणी केली. काही नेते टुरिस्ट म्हणून येतात आणि जातात, पायऱ्यांवर चॅनेलचा बूम बघून धूम ठोकतात, अशी बोचरी टीका ठाकरेंवर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT