Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde PC LIVE : राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; माझा निर्णय पीएम मोदी, शाह यांना कळवला

Today Eknath Shinde Press Conference : दोन दिवसांच्या मौनानंतर वादावर पडदा टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

Sachin Waghmare

Mumbai News: विधानसभेच्या निकालानंतर महायुतीला घवघवीत यश तर मिळाले, पण मुख्यमंत्रीपदावरुन एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मोठे विधान केले आहे. माझा निर्णय पीएम मोदी, शाह यांना कालच कळवला आहे. महायुतीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

बुधवारी दुपारी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले. विकास व कल्याणकारी योजनांची सांगड घातल्याने मोठे यश मिळाले आहे. निवडणूक काळात पहाटे पर्यंत काम करीत होतो. ८० ते ९० सभा घेतल्या आहेत. कॉमन मॅन म्हणून काम केले. सर्वसामान्य जनतेसाठी काम केले. लाडक्या बहीण, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काम करीत राहिलो. त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत झाला. सर्वसामान्य माणसाला याचा मोठा फायदा झाला. अडीच वर्षाच्या काळात काम करीत राहिलो. अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर पीएम नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा विश्वास दाखवला, असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) सांगितले.

शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न महायुती सरकारच्या काळात सोडविण्यात आले. राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम महायुती सरकारने केले. या निवडणुकीत आम्ही केलेल्या विकास कामांमुळे महायुतीवर मताचा वर्षाव झाला. त्यासाठी आम्ही अडीच वर्षाच्या काळात केलेले काम महत्वाचे ठरले. महाराष्ट्रच्या जनतेसाठी काम केले आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे लोक नाहीत. अडीच वर्षाच्या काळात जनतेचे मोठे प्रेम मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून चार दिवस उलटले तरी भाजप आणि शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चढाओढ सुरू होती. पण देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार हेही जवळपास निश्चित झाले होते. बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले .

राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस नवे मुख्यमंत्री होतील, असे जवळपास निश्चित झाले होते. दोन दिवसापासून मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा असताना त्यांनी हे सर्व दावे फेटाळले. माझी पीएम नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा महायुतीला पाठिंबा असणार असल्याचे बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व जी भूमिका घेईल, त्याला संपूर्ण पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT