Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde reaction Devabhau campaign : सीएम फडणवीसांच्या देवाभाऊ कॅम्पेनवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रया; म्हणाले, 'श्रेयवादाच्या लढाईत आम्ही...'

Eknath Shinde on Fadnavis campaign News : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याने मराठा समाज बांधवाने गुलाल उधळला. तर आता महायुतीमधील तीन ही पक्षात यावरून श्रेयवाद सुरु झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai news : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांनी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन केले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले. त्यावेळी उपसमितीने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठा समाजाच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याने मराठा समाज बांधवाने गुलाल उधळला. तर आता महायुतीमधील तीन ही पक्षात यावरून श्रेयवाद सुरु झाला आहे.

वर्तमानपत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला हे आरक्षण मिळाले असल्याने देवाभाऊ कॅम्पेन राबवून त्यांनी केलेल्या कामांचे कौतुक करण्यात येत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रया दिली आहे. श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाहीत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसापासून मराठा समाजाने आंदोलन केले. महायुती सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे महायुती सरकरने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा मोठा निर्णय घेतला. त्याचा फायदा आता मराठा समजला होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना शांतपणे परतावून लावल्यानंतर आता भाजपकडून (BJP) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. मराठा समाजाच्या मागणीसाठी वेगवेगळे तीन जीआर काढण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर आता भाजपकडून मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक करण्यात येत आहे.

त्यासाठी भाजपकडून राज्यभरात देवाभाऊ कॅम्पेन राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आणि मुंबईत काही ठिकाणी बॅनर लावून देवाभाऊ कॅम्पेन राबविण्यात आले. त्यामुळे या कॅम्पेनवरून आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.

आता या कॅम्पेनवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, 'श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाहीत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम महायुती सरकार करत आहे. महायुती सरकारने मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या रुपाने मिळालेली आहे. देवेंद्रजी आणि आम्ही दुसरी इनिंग सुरू केली आहे, यापुढेही देखील आम्ही असेच काम करत राहू; हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT