Vice President Election : उपराष्ट्रपती निवडणुकीआधी दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा; एनडीएच्या खासदारांचे डिनर रद्द, इंडिया आघाडीची बैठक लांबणीवर

Delhi high voltage drama politics News : या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
rahul-gandhi-questions-narendra-modi
rahul-gandhi-questions-narendra-modi sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबरला होत असून दोन्ही सभागृहांचे खासदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक चार दिवसावर आली असल्याने दिल्लीत सध्या हायव्होल्टेज ड्रामा पाहवयास मिळत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी शनिवारी एनडीएच्या खासदारांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. मात्र,अचानक डिनर रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचीदेखील शनिवारी कोणतीही बैठक होणार नाही.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्यावतीने आजच्या दिवसात सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठका अपेक्षित होत्या. पण त्या एकाएकी रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीला केवळ चार दिवसाचा अवधी शिल्लक असताना दोन्ही बाजूनी वेगवान घडामोडी घडताना दिसत नाहीत.

rahul-gandhi-questions-narendra-modi
Manoj Jarange Patil : मराठवाड्यातील मराठे सरसकट कुणबी होणार, मनोज जरांगे-पाटील यांचा दावा, भुजबळांनाही डिवचले

भाजपचे (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी शनिवारी सायंकाळी एनडीएच्या सगळ्या खासदारांना जेवणासाठी बोलावण्यात आलं होते. पण पंजाब, हिमाचल प्रदेशात आलेला पूर, त्यामुळे झालेलं नुकसान या पार्श्वभूमीवर डिनर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एनडीएच्या गोटातील हायव्होल्टेज घडामोडींना ब्रेक लागला आहे. भाजपने त्यांच्या खासदारांना ६ सप्टेंबरपर्यंत दिल्लीत पोहोचण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे भाजपचे बहुतांश खासदार राजधानीत आहेत.

rahul-gandhi-questions-narendra-modi
Manoj Jarange agitation: सीएम फडणवीसांची 'तिरकी चाल' यशस्वी; जरांगेंच्या कोअर टीममधील वकिलाच्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट!

दुसरीकडे शनिवारी इंडिया आघाडीचीही कोणतीही बैठक होणार नाही. शनिवारी रात्रीच्या सुमारास इंडिया (India Allience) आघाडीची व्हर्च्युअल बैठक होईल, अशी चर्चा होती. पण विरोधकांच्या आघाडीची कोणतीही बैठक होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात कोणत्याही बैठका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

rahul-gandhi-questions-narendra-modi
Manoj Jarange: शब्द पाळला नाही तर येत्या निवडणुकीत धुरळा उडवू : उपचारानंतर चार्ज होताच जरांगे पाटील पुन्हा मैदानात

आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीत एनडीएची बाजू वरचढ दिसत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीए बहुमतात आहे. त्यामुळे एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यांच्यासमोर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचे आव्हान आहे.

rahul-gandhi-questions-narendra-modi
Devendra Fadnavis: फडणवीसांचा उद्योगस्नेही रोडमॅप काय आहे? 100 सुधारणांसाठी 'वॉर रूम'

कोण बाजी मारणार उत्सुकता शिगेला?

एनडीएचे उमेदवार असलेले राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूचे आहेत. ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. विशेष म्हणजे तामिळनाडूतून एनडीएचा एकही लोकसभा खासदार नाही. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले सुदर्शन रेड्डी मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत. त्या राज्यात इंडिया आघाडीचा एकही लोकसभा खासदार नाही. रेड्डी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचीदेखील आज कोणतीही बैठक होणार नाही. या निवडणुकीत एनडीएकडे वरचढ आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीए बहुमतात आहे. त्यामुळे एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यांच्यासमोर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचे आव्हान आहे.

rahul-gandhi-questions-narendra-modi
Manoj Jarange: शब्द पाळला नाही तर येत्या निवडणुकीत धुरळा उडवू : उपचारानंतर चार्ज होताच जरांगे पाटील पुन्हा मैदानात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com