Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve Letter To CM: टोल वसुलीत `झोल`, श्वेतपत्रिका काढा ; दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political News : सध्या राज्यातील रस्त्यावरील खड्डे, राष्ट्रीय महामार्गावरील अपुऱ्या असुविधा आणि तरीही सुरू असलेली टोल वसुली याचा मुद्दा चांगलाच तापलाय. (Toll Plaza News) मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलेल्या आंदोलनानंतर या टोल वसुलीच्या प्रश्नाला अधिकच धार आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रश्नात उडी घेत राज्यातील टोल वसुलीत `झोल` झाल्याचा आरोप केला आहे.

मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता व्यक्त करत दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र पाठवून या संदर्भात श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडा, अशी मागणी केली आहे. (Shivsena) राज्यातील टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत उड्डाणपूलांसाठी झालेला खर्च, टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्याबाबत श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणली पाहिजे.

मुंबईत सुमारे ५५ उडाणपुलाचा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी `एमईपी` या कंपनीला सन २०१० पासून मुंबईच्या प्रवेश द्वाराजवळ टोल वसूल करण्यास परवानगी दिलेली आहे. (Maharashtra) तथापि सदर उड्डाणपूलासाठी झालेल्या खर्चाची वसुली पूर्ण होवूनही सदर कंपनीद्वारे टोल वसुली सुरु आहे.

त्याचा नाहक भुर्दंड राज्यातील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. याचप्रमाणे राज्यातील अनेक टोलसंदर्भात खर्च वसुली पूर्ण होऊन देखील गत काही वर्षापासून टोल वसूली सुरु आहे. टोल वसुलीची खरी आकडेवारी संबंधित कंपन्यांकडून लपविली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैर व्यवहार होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता रस्ते, उड्डाणपूल यासाठी झालेला खर्च टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्याबाबत श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT