Pankaja Munde In Action: ब्रेकनंतर पंकजा मुंडे सक्रीय ; दहा जिल्ह्यांच्या दौऱ्यातून `शिव` शक्ती दाखवणार..

BJP Political News : दहा जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांची भेटही घेणार आहेत.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama

Marathwada Political News : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे या दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर पुन्हा सक्रिय होत आहेत. पंकजा मुंडे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये देवदर्शन दौरा करणार आहेत. मात्र, हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्या लवकरच काॅंग्रेसमध्ये जाणार, अशा अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर माध्यमांबद्दल नाराजी व्यक्त करत पंकजा यांनी दोन महिने राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता.

Pankaja Munde News
Clash In Ajit Pawar NCP : धाराशिव राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात राडा ! संजय बनसोडे यांच्यासमोर मोठा पेच

राज्यभरात अकरा दिवसांच्या या दौऱ्यात त्या दहा जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांची भेटही घेणार आहेत. (Marathwada) आता मात्र, शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून आपण जनतेच्या संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यात नागरिकांना मला भेटण्यासाठी यावे, असे आवाहन देखील पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे.

पंकजा यांच्या दौऱ्याला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात होणार आहे. दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये त्या दौरा करणार आहेत. (BJP) दौरा केवळ देवदर्शनासाठी असणार आहे. दौऱ्यामध्ये पाच हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

त्यामुळे ब्रेकवरुन परतल्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय होणार का ? अशी चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजी नगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष राजकीय घडमोडींमध्ये सहभागी न होता, शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून लोकांना भेटणार असल्याचे जाहीर केले आहे.

पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी काढण्यात येत आहे. त्याच बरोबर शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेचेही दर्शन या दौऱ्यात पंकजा मुंडे घेणार आहेत. त्यामुळे हा शिवशक्ती दौरा असल्याचे सांगितले जाते. दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com