World Cup Final News Sarkarnama
महाराष्ट्र

World Cup Final News : फडणवीस-सावे सागर बंगल्यात बसून पहातायेत विश्वचषकाची फायनल..

Jagdish Pansare

Maharashtra News : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील विश्वचषकांचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू आहे. (World Cup Final News) महाराष्ट्रासह देशभरातून हजारो क्रिकेट चाहते या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईतून अहमदाबादसाठी विशेष रेल्वेही सोडण्यात आल्या होत्या.

न्यूझीलंड विरुद्धचा सेमीफायनलचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता. तेव्हा राज्यातील बहुतांश मंत्री, सेलिब्रेटींनी वानखेडेवर हजेरी लावली होती. (Maharashtra) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सपत्नीक हा सामना पाहण्यासाठी गेले होते. भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत दिमाखदारपणे अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

आज संपुर्ण देशात आणि जगात विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा फिवर आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांच्यासह देशभरातील राजकीय पक्षांचे नेते हजर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी येणार असल्याचे समजते.

ऑस्ट्रेलियासमोर भारताने विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विश्वचषक कोण जिंकणार? याची उत्सूकता शिगेला पोहचली असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सामन्याचा आनंद लुटला आहे. मुंबईतील सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी फडणवीस हे अंतिम सामना पाहत आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री अतुल सावेही उपस्थितीत आहेत. रोमहर्षक दिशेने जाणारा विश्वचषकाचा हा अंतिम सामना खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत भारतीय संघाने जिंकावा, अशी सदिच्छाही या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे.

या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले आहेत. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती. आता भारतीय संघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT