Ambadas Danve | eknath shinde | devendra fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve On Kunal Kamra : फडणवीस म्हणतात, माफी मागा तर दानवे म्हणाले, गरज नाही! कुणाल कामराच्या गीताने राजकीय सूर बिघडले...

Fadnavis urges an apology, Danve dismisses the need for one, while Kunal Kamra's controversy continues to escalate. : एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांनी गद्दारीच केली. मग कुणाल कामरान याने माफी मागण्याचा प्रश्नच कुठे येतो? मी आजही म्हणतो एकनाथ शिंदे गद्दार आहेत

Jagdish Pansare

Maharashtra Politics : स्टॅन्डअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणाल कामरा याने राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे एक गीत तयार केले. ज्यात शिवसेनेमध्ये झालेले बंड आणि ते घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक सादरीकरण आहे. यावरून पित्त खवळलेल्या शिंदे यांच्या शिवसैनिकांनी कुणाल कामरान याचा स्टुडिओ फोडला. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात या घटनेवर प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले असून त्यांच्यातील राजकीय कलगीतुऱ्याने महाराष्ट्रातील जनतेचे मनोरंजन होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कुणाल कामरान याने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफी मागण्याची गरज नाही, असे म्हणत या वादात उडी घेतली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांनी गद्दारीच केली. मग कुणाल कामरान याने माफी मागण्याचा प्रश्नच कुठे येतो? मी आजही म्हणतो एकनाथ शिंदे गद्दार आहेत, मग मला माफी मागायला सांगणार का? आणि मी ती मागणार का? असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. कुणाल कामरा हा एक कॉमेडियन आहे त्याने आपल्या पद्धतीने विडंबनात्मक गाणे सादर केले. ते शिंदेंना व त्यांच्या समर्थकांना झोंबले याचा अर्थ त्या गाण्यात तथ्य आहे.

अन्यथा कुणाल कामरान यांच्या स्टुडिओची तोडफोड करण्याची काय गरज होती?, असा अहवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्यावर चाल करून जाण्याची हिंमत यांनी का दाखवली नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान यांना चालतो का? असा थेट सवालही अंबादास दानवे यांनी केला.

विधानसभेत दोन दिवस संविधानावर चर्चा होणार आहे. असे असताना ज्या संविधानाने आणि लोकशाहीने प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, त्याची कामरान यांना माफी मागायला लावून गळचेपी करणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे आणि सरकारला खडेबोल सुनावले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT