Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरण तापणार? "माफी मागा, अन्यथा तोंड काळे करू, चोप देऊ", शिवसेनेची धमकी

Shivsena On Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यावरून आता वाद उफळला असून शिवसेनेनं विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आदोलन सुरू केले आहे.
Kunal Kamra
Kunal Kamrasarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने आक्षेपार्ह गाण्याची रचना केली. हे व्हायरल झाल्यानंतर आता शिवसैनिकांचा राडा पाहायला मिळत आहे. संतापलेल्या शिवसैनिकांनी येथील द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल असणाऱ्या कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला. यामुळे शिवसैनिकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या तोडफोडीचा निषेध करताना कुणाल कामराने हातात संविधानाची प्रत घेत 'पुढे जाण्याचा एकमेव मार्ग', असे म्हटलं आहे. या वादामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून शिवसैनिकांनी कुणाल कामराला धमकी दिली आहे.

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांनी खार येथील दि हॅबिटेट स्टुडिओमध्ये तोडफोड केली. याप्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आता शिवसेनेकडून कुणाल कामराला धमकी देण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी, कामरा याने दोन दिवसात माफी मागावी, अन्यथा दिसेल तिथे त्याचे तोंड काळे करू, असा इशारा दिला आहे.

याचमुद्द्यावरून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत, कुणाल कामरा यांचे गाणे जर बदनामीकारक असेल तर ते सहन केलं जाणार नाही, असे म्हटलं आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी देखील कुणाल कामराला इशारा देताना, त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.

Kunal Kamra
Eknath Shinde Controversy : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...', एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं, शिवसैनिक आक्रमक; स्टुडिओ फोडलं, कुणाल कामरावर गुन्हा

शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आज त्याची धुलाई करू. कुणाल कामरा हा काँग्रेसच्या इकोसिस्टिमचा एक भाग आहे. एकीकडे राहुल गांधींबरोबर तो पदयात्रा करतो आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे व शरद पवारांबरोबरही दिसतो, असा घणाघात केला आहे. तर जेष्ठ नेते राम कदम यांनी दिशा सालियन प्रकरणावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा पुढे आणल्याचा दावा केला आहे.

दरम्यान कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. कुणाल कामराविरोधात शिवसेनेकडून एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kunal Kamra
Aaditya Thackeray : राज्य घटनेची प्रत दाखवत कुणाल कामराचं शिवसेनेला सडेतोड उत्तर; भ्याड टोळीचा हल्ला, आदित्य ठाकरेही भडकले

हे सहन केलं जाणार नाही : फडणवीस

तर या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, कुणार कामराने संविधानाचं पुस्तक दाखवून माफी मागितली पाहिजे, असे म्हटलं आहे. तर कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला असून स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने 2024 साली दाखवून दिलं आहे. राज्यातील माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्याचे वरिष्ठ नेत्याचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. व्यंग करा, पण अपमानित करण्याचा अधिकार नाही. ते सहन केलं जाणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com