New dehli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या तिन्ही नेत्यांनी एकत्रित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ हेही उपस्थित होते. या भेटीवेळी राष्ट्रपती मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाचे निमंत्रण दिले. 31 ऑक्टोबरला दुपारी नाशिकमध्ये कुंभमेळ्याचा ध्वजारोहण समारंभ होणार आहे.
राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आयोजित ध्वजारोहण सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण तसेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेपासून आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषिसमृद्धी आणि खाद्यसंस्कृतीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही प्रदान केला.
राष्ट्रपती यांना ध्वजाराहेणाच्याच दिवशी होणाऱ्या गोदा आरती, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित कॉफीटेबल बूक आणि कुंभमेळा टपाल तिकीट अनावरण करण्यासाठीचे यावेळी निमंत्रण देण्यात आले.
या प्रसंगी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.