Tukaram Mundhe action misused in fraud case Sarkarnama
महाराष्ट्र

Fake FDA Officers : धक्कादायक! तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा गैरफायदा, बनावट FDA अधिकारी बनून हॉटेलवर धाड; दोघांवर गुन्हा दाखल

Mumbai Hotel Targeted by Fake FDA Officials : अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबईतील ६ हॉटेल्स, बेकरी आणि क्लबवर FDA ची मोठी कारवाई. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने परवाने निलंबित केले असून 19 जणांना अटक.

Aslam Shanedivan

Mumbai Crime News: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार हातात घेतल्यापासून राज्यात भेसळ आणि गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी उघडलेल्या धडक कारवाईमुळे अनेकांचे सळो की पळो झाले असतानाच आता मुंढे यांनी मुंबईत धडक कारवाई करत सहा हॉटेल्स, बेकरी आणि क्लब यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. या सर्वांचे व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

एकीकडे या धडक कारवायांचे सत्र सुरू असतानाच आता मुंबईत एक धक्कादायक बाब समोर आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही कारवाई बनावट FDA अधिकारी बनून हॉटेलवर धाड टाकल्याप्रकरणी करण्यात आली आहे. तर या दोघांकडून तुकाराम मुंढे यांच्या नावाचा गैरफायदा घेत हॉटेल चालकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडे असलेल्या प्रसिद्ध 'आहार हॉटेल'वर दोघा संशयितांनी धाड टाकली. यावेळी या दोघांनी आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत हॉटेलची तपासणी सुरू केली. यावेळी या दोघांनी हॉटेल मालकाकडे अन्न नमुने तपासण्याच्या नावाखाली दमदाटी करत कारवाईची थेट धमकी दिली.

यावेळी या दोघांनी हॉटेल मालकाला कारवाईची भीती दाखवत बनावट ओळखपत्र दाखवत फसवणुकीचा प्रयत्न केला. यावेळी या दोघांच्या बोलण्यावरून आणि वर्तनावरून हॉटेल मालक यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत तपास केला आणि दोघा बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. यानंतर विजय जाधव आणि स्वाती तुळसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT