Ravikant Tupkar Sarkarnama
महाराष्ट्र

Ravikant Tupkar : शेतकऱ्याची लायकी काढणाऱ्या तानाजी सांवतांना रविकांत तुपकरांचा इशारा, 'अ‍ॅट्रॉसिटीप्रमाणे...'

Ravikant Tupkar Criticized tanaji sawant : मंत्री सावंत यांनी शेतकऱ्याची माफी मागावी अन्यथा शेतकरी सरकारला लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असे बच्चू कडू म्हणाले.

Roshan More

Ravikant Tupkar News : मंत्री तानाजी सावंत यांनी महायुतीमधील आपला सहकारी पक्ष राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. हा वाद क्षमायच्या आधीच तानाजी सावतं हे प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याची औकात काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर संतप्त झाले आहेत.

'शेतकऱ्यावर जर कोणी दादागिरी करत असेल अर्वाच्च भाषेत बोलत असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही या नेत्याला धडा शिकवणार', असा इशारा रविकांत तुपकर यांनी तानाजी सावंत यांना दिला.

सरकारच्या भरवशावर तुम्ही जिवंत आहात. सत्तेतील लोकांनी विनम्र असायला हवे. त्यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे, असे तुपकर म्हणाले. एससी एसटीसाठी ज्या प्रमाणे अ‍ॅट्रॉसिटी कायदा आहे. त्या प्रमाणे शेतकऱ्यांसाठी देखील कायदा असायला हवा, असे देखील तुपकर यांनी सांगितले.

अमोल मिटकरी, बच्चू कडूंची टीका

सावंत यांच्या वक्तव्याचा अमोल मिटकरी, बच्चू कडू यांनी निषेध केला आहे. मंत्री सावंत यांनी शेतकऱ्याची माफी मागावी अन्यथा शेतकरी सरकारला लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असे बच्चू कडू म्हणाले. तर, शेतकऱ्याची लायकी काढणाऱ्या मंत्री सावंत यांची लायकी मुख्यमंत्री शिंदे त्यांना दाखवणार आहेत की नाही, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.

तानाजी सावंत काय म्हणाले?

मंत्री सावंत शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले, "तुम्ही खाली बसा, मी स्वत: इंजिनिअर आहे. तुमचं समाधान होण्याशी कारण आहे. तुम्ही आता सांगताय. गेल्या 10 वर्षात तुम्ही बोलले, नाहीत, आज बोलताय. आपण विकासाचं बोलण्यासाठी आलोय. विकासाचं ऐका. कोणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. सुपारी घेऊन बोलायचं नाही. आम्हालाही कळतं. त्यामुळे लायकीत राहून बोलायचं. ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं नाही. मी गेल्या पाच वर्षात कोणालाही माघारी पाठवलं नाही. मी विठ्ठलाचा भक्त आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT