Deepak Kesarkar : शिवरायांच्या पुतळ्याचं काम जयदीप आपटेला कोणी दिलं? केसरकर म्हणाले, "राष्ट्रप्रेमाची भावना..."

Deepak Kesarkar On Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलच्या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काल खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे.
Deepak Kesarkar
Deepak KesarkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 31 August : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलच्या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काल खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

अशातच आता या प्रकरणाशी संबंधित 'वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल म्हणून ही दुर्घटना घडली' असं वक्तव्य केल्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या दीपक केसरकरांनी महाराजांचा पुतळा बनवण्याचं काम जयदीप आपटेला कोणी दिलं होतं? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

जयदीप आपटेला काम कोणी दिलं असा प्रश्न विचारल्यानंतर केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, "एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे हा महाराष्ट्र शासन आणि नेव्हीचा एकत्रित उपक्रम होता. त्यामुळे या कार्यक्रमाकडे बघताना या दृष्टीने बघता कामा नये. त्यामध्ये राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे, त्याकडे बघितलं पाहिजे. चूक, अपघात घडू शकतात, पण महाराजांचे जे ब्रीदवाक्य होतं ते नेव्हीच्या फ्लॅगवर अभिमानाने फडकतं."

Deepak Kesarkar
NCP News : विकास कामांवरून पटेल यांची अनिल देशमुखांवर टोलेबाजी

दरम्यान, आता मालवणमध्ये (Malvan) नवीन पुतळा बसवण्याची प्रक्रिया कशी असेल? या संदर्भात बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मालवणमधील प्रकरणाबाबत तीन बैठका घेतल्या आंतरराष्ट्रीय किर्तीचे मूर्तिकार उपस्थित होते. सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं जातं आहे.

Deepak Kesarkar
Video Ajit Pawar : तानाजी सांवतांनी ताणलं, अजितदादांनी ठणकावलं; कडक शब्दात दिलं उत्तर

भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल परिसराचा ही विकास केला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच शिवाजी महाराजांचा आदर राखण्यासाठी आपण हवं ते करू. शिवाजी महाराजांचा अनादर होईल असं मी कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं केसरकरांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com