Farmer union complaint Sarkarnama
महाराष्ट्र

Farmer union complaint : फडणवीस, शिंदे, पवार अन् कोकाटेंकडून संघटित फसवणूक; पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून राजकारण तापणार?

Maharashtra farmer union files police complaint against Mahayuti government leaders loan waiver fraud : कर्जमाफी न करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महायुती सरकारमधील सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यासह चौघांविरोधात शेतकरी संघटनेनं तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra farmers protest news : विधानसभा निवडणूकीत भाजपचे देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी एकत्रितरित्या राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, या विषयाला बगल देऊन शेतकऱ्यांची संघटित फसवणूक केली.

याविरोधात शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध गृह मंत्रालयाच्या ई-प्रणालीवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात देखील या तक्रारीची प्रत दिल्याने खळबळ उडाली आहे. शेतकरी संघटनेच्या या तक्रारीवरून राज्याचे राजकारण तापणार असे संकेत मिळालेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी एकत्रितरित्या राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. यावर विश्वास ठेवून राज्यातील शेतकऱ्यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महायुतीच्या विधानसभा उमेदवारांना मते देऊन सरकार अस्तित्वात आणले. परंतु, सरकार अस्तित्वात आणल्यानंतर व पदभार स्वीकारल्यानंतर कर्जमाफीच्या विषयाला बगल देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली.

ही शेतकऱ्यांच्या (Farmer) दृष्टीने संघटित फसवणूक असून याबाबत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीन महिन्यापासून जनआंदोलने छेडले आहे. सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्याने. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालयाच्या ई-प्रणालीवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, माणिकराव कोकाटे यांनी संयुक्तरित्या संघटित शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यासंबंधी योग्य तो आदेश पारित करून अर्जदार याची तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावा, असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच या अर्जाची एक प्रत तक्रारदार युवराज जगताप यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दिली. अर्जदार जगताप यांनी आपला संपूर्ण शंभर टक्के कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर असल्याचे दिलेल्या अर्जात म्हटले आहे. शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने ॲड. काळे आणि अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी रॉबिन बंसल यांना तक्रारीची प्रत दिली.

शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी औरंगाबाद खंडपीठात 32 वर्षे वकिली म्हणून काम केले. याबाबत गेली पंधरा दिवस कायद्याचा बारकाईने भारतीय दंड संहिता कायद्याचा अभ्यास करून राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक हित रक्षणार्थ फिर्याद केली आहे. अशा फिर्यादी राज्यातील लाखो थकीत कर्ज असलेले शेतकरी प्रत्येक पोलिस ठाण्यात दाखल करणार आहोत. याबाबत पोलिस प्रशासनाने भूमिका न घेतल्यास आपण उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सदर फिर्यादीवर न्यायालयात दाद मागणार आहोत, असा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT