Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
महाराष्ट्र

Government Land : सरकारी जमिनी कसणाऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ , महसुलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

Government Chandrashekhar Bawankule : सरकारच्या निर्णयामुळे चार ते पाच लाख शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule News : सरकारी, देवस्थान किंवा अन्य जमीन कसत असूनही महसूल दप्तरी नोंद नसलेल्या शेतकरी कुटुंबांना केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे चार ते पाच लाख शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उपसमितीची बैठक पार पडली. या वेळी विविध विभागांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीत वाढ करण्यासोबतच, ‘मनरेगा’ आणि ‘डीपीडीसी’ योजनांचे एकत्रीकरण करून कामांची पुनरावृत्ती टाळावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा विभाग स्तरावर चारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याशिवाय, गाळपेर जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना ज्वारी, मका, हरभरा यांसारखी पिके घेण्यासाठी मंजुरी देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT