Chandrashekhar Bawankule: मंत्री बावनकुळेंचा आणखी एक मोठा निर्णय, चार जिल्ह्यांचं प्रशासकीय विभाजन होणार, 47 नवीन अपर तहसील कार्यालये

Mahayuti Government: चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारमध्ये महसूलमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यापासून एकापाठोपाठ एक धक्कादायक निर्णय घेतले आहेत.आता त्यांनी राज्यातील चार जिल्ह्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारमध्ये महसूलमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यापासून एकापाठोपाठ एक धक्कादायक निर्णय घेतले आहेत.आता त्यांनी राज्यातील चार जिल्ह्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री बावनकुळे यांनी जनतेच्या सोयीसाठी चार जिल्ह्यांचं प्रशासकीय विभाजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

राज्यातील बारामती, पंढरपूर, दापोली आणि नागपूर ग्रामीण या चार ठिकाणी नवीन अपर (अतिरिक्त) जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांमध्ये 47 नवीन अपर तहसील कार्यालयांची निर्मिती देखील केली जाणार आहे.

महसूलमंत्री म्हणून काम करताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या महसूलसंबंधीच्या अनेक निर्णयांमुळे चर्चेत आले आहेत.सिमेंट रस्त्यांच्या कामांऐवजी 'शिवकालीन बंधारे' आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच 1 जानेवारी 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर वसलेल्या नागरिकांना मालकी हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असल्याचंही त्यांनी यापूर्वी जाहीर केलं आहे. आता चार ठिकाणी नवीन अपर (अतिरिक्त) जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. यासोबतच, राज्यातील एकूण 21 जिल्ह्यांमध्ये 47 नवीन अपर तहसील कार्यालयांची निर्मिती देखील केली जाणार असून,

Chandrashekhar Bawankule
Nitish Kumar News: मोठी बातमी! नितीश कुमार यांनी CM पदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर पहिला डाव टाकला,भाजपला हादरा; नव्या पक्षासोबत युतीची घोषणा

महसूलमंत्री बावनकुळे यांच्या 'आदर्श नोंदणी पॅटर्न'ची देशपातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. केंद्राकडून या प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान देण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय ही मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या सहा प्रमुख जिल्ह्यांमधील मुख्यालयांच्या ठिकाणी ३० नवीन आदर्श कार्यालये होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com