PM Kisan 22nd installment payment status Sarkarnama
महाराष्ट्र

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मोठा झटका! 30 लाख शेतकरी 22 व्या हप्त्याला मुकणार? पाहा काय आहे कारण, या यादीत तुमचे नाव तर नाही ना?

how to check pm kisan beneficiary list online : PM किसान योजनेचा २२ वा हप्ता मिळणार नाही का? ३० लाख शेतकरी यादीतून वगळले जाण्याची शक्यता. कारण जाणून घ्या आणि तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का ते तपासा.

Rashmi Mane

राज्यातील बळीराजासाठी मोठी बातमी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असणाऱ्या शेतकऱ्यांना यावेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार देशभरातील 30,18,361 शेकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता जमा होणार नाहीये.

केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांचे बँक खात्यांना आधार कार्ड जोडणे ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र जवळजवळ 30 लाख शेतकऱ्यांचे बँक खाते अजूनही आधार कार्ड लिंक नाहीये. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही त्यांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्रस ही रक्कम मिळण्यासाठी खाते आधारांशी लिंक असणे आणि ई- केवायसी प्रक्रिया पुर्ण करणे बंधनकारक आहे. सरकारकडून या पूर्वीही अनेकदा ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तरीही आतापर्यंत काही शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.

बँक खाते आणि आधार लिंक नसल्यास लाभार्थ्यांची ओळख पडताळणी पूर्ण होत नाही, तो पर्यंत या योजनेचा निधी थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया थांबवली जाते. त्यामुळे २२ वा हप्त्याची रक्कम अनेकांना मिळणार नाही, अशी स्पष्ट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

तुमचे नाव या यादीत आहे की नाही,

या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लाभार्थी यादी तपासता येते. तसेच, जवळच्या बँकेत किंवा सीएससी केंद्रात जाऊन आधार लिंक स्थिती आणि ई-केवायसी पूर्ण झाली आहे का, याची खात्री करून घ्यावी. आवश्यक असल्यास तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्ताही अडकू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT