nilesh navalakha, vikram gokhale
nilesh navalakha, vikram gokhale sarkarnama
महाराष्ट्र

गोखलेंसोबत काम करणार नाही ; राष्ट्रीय पुरस्कारविजेता निर्मात्याची घोषणा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिनं भारतीय स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं. गायक अवधूत गुप्ते यांनीही अप्रत्यक्षपणे गोखलेंची बाजू घेतली आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे. आता एका चित्रपट निर्मात्याने कंगनाबाबत गोखलेंनी घेतलेल्या भूमिकेबाबत गोखलेंवर निशाणा साधला आहे. यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबतचे टिवट त्यांनी केलं आहे.

आपल्या टि्वटमध्ये निलेश नवलाखा (nilesh navalakha) म्हणतात, ''मी विक्रम गोखले (vikram gokhale) बरोबर काम केलं आहे. कलाकार म्हणुन मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे, परंतु त्यांनी कंगना रानावत (kangana ranaut) जे बोलली ; त्याचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्याबरोबर काम करणार नाही हे पण घोषित करतो,''

निलेश नवलाखा हे शाळा, फँड्री, सिद्धांत सिनेमासह अशा अनेक चित्रपटाचे निर्माते आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांनी कंगनाची (kangana ranaut) पाठराखण केली आहे. तिच्या विधानाचं गोखलेंनी समर्थन केलं आहे. विक्रम गोखले म्हणाले, ''कंगना जे म्हणाली ते खरंय, मी तिच्या वक्तव्याचे समर्थन करतो,'' यावेळी गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची स्तृती केली.

''शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे, याबाबत मी पुढाकार घेतला आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं,'' असे गोखले म्हणाले. ''मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?'' असा सवाल गोखलेंनी उपस्थित केला. लाल बहादूर शास्त्री सोडून मी देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो, पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते, ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे ? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे,'' असे गोखले म्हणाले.

राखी सावंत (Rakhi Sawant) हिनेही कंगनाच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने असे म्हटले की, तिला कंगनाच्या या वादग्रस्त विधानामुळे धक्का बसल्याने थेट रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा तिने शेअर केला आहे. राखी सावंत हिने असे म्हटले की, मी रुग्णालयात असून नर्स माझे चेकअप करतेय. मी आजारी पडली, मला धक्का बसलाय. एक अभिनेत्री तिला नुकताच पद्मश्री पुरस्कार दिला गेला तिने असे म्हटले की, आपल्याला स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिलाले आहे. पण भीक म्हणून तुला पद्मश्री मिळाला आहे असे राखीने कंगना हिला सुनावले आहे. आमच्या देशातील जवानांनी कारगिलच्या युद्धात जो विजय मिळवला होता तर त्यांचे बलिदान व्यर्थ आहे का? ज्या प्रकारे कमेंट्स केल्या जात आहेत त्याबद्दल दु:ख होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT