Amol Kolhe  sarkarnama
महाराष्ट्र

Flight Delay : विमानसेवेच्या 'सावळ्या गोंधळा'चा खासदार अमोल कोल्हेंना फटका; तब्बल 3 तास विमानतळावर!

Flight Services Disrupted Amol Kolhe : विमानवाहतूक सेवा विस्कळीत झाल्याचा फटका खासदार अमोल कोल्हेंना बसला आहे. त्यांनी आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Roshan More

Amol Kolhe News : विमानवाहतूक सेवा देणाऱ्या इंडिगो कंपनीची सेवा विस्कळीत झाली आहे. मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणाने मागील दोन दिवसांपासून इंडिगोच्या प्लाईट कॅन्सल होत आहेत. उशीरा उड्डान घेत आहेत.या विमानसेवेच्या 'सावळ्या गोंधळा'चा फटका खासदार अमोल कोल्हे यांना देखील बसला आहे.

खासदार कोल्हे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरून ते विस्कळीत विमानसेवेमुळे तीन तास विमानतळावर थांबून असल्याचा अनुभव शेअर केला. ते म्हणाले, देशांतर्गत विमानसेवेच्या 'सावळ्या गोंधळा'मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल.

तब्बल तीन तास विमानतळावर अडकून पडलेल्या अमोल कोल्हेंनी म्हटले आहे की,सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या 'निवांत वेळेत' एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय.

ही अपेक्षा नव्हता...

लेख लिहून आपण वेळ सत्कारणी लावली असे सांगत असताना कोल्हे यांनी इंडिगोवर राग देखील व्यक्त केला. ते म्हणाले, इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती.यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच.

प्रवाशांना फटका...

विमानसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अनेक प्रवाशी सोशल मीडियामधून संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, मागील तीन दिवासंपासून दररोज १७० ते २०० उड्डाने रद्द होत असल्याची माहिती आहे. या गैरसोयीबद्दल इंडिगोकडून माफी मागण्यात आली असून लवकरात लवकर सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT