Maharashtra politics clash: सराईत गुन्हेगार ते 307 दाखल... चंद्रकांत पाटील-एकनाथ खडसे भिडले; सगळी हिस्ट्रीच काढली!

Patil Khadse verbal clash history News : ऐन मतदानाच्या दिवशी या दोन गटात वाद झाल्याने एकमेकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Chandrakant Patil & Eknath Khadse
Chandrakant Patil & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. मुक्ताईनगर येथील नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या दोन नेत्यामधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी या दोन गटात वाद झाल्याने एकमेकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुक्ताईनगर नगरपंचायतीवर अनेक वर्षे खडसे कुटुंबीयांचे राजकीय वर्चस्व राहिले आहे. भाजपने मुक्ताईनगर शहरात स्वतंत्र भाजपचे (BJP) पॅनल उभे केले आहे. तर दुसरीकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे पॅनल स्वतंत्र उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. निवडणूक प्रचारवेळी व मतदानाच्या दिवशी या दोन गटात मोठा संघर्ष पाहवयास मिळाला.

Chandrakant Patil & Eknath Khadse
BJP internal conflict news: बावनकुळे-सुलेखा कुंभारे यांच्यातील वाद कशामुळे? भाजपमध्ये उलटसुलट चर्चा

निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला. या सर्व घटनाक्रमांनंतर रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा दावा करीत शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही कार्यकर्त्यांच्या जत्थ्यासह जाऊन शिवसेना कार्यकर्त्यांची देखील तक्रार घ्यावी, असे पोलिसांना म्हटले. तसेच शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटलांनी लावून धरली होती. त्यातूनच दोन्ही गताकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Chandrakant Patil & Eknath Khadse
Shivsena UBT : 'केंद्रीय कृषिमंत्र्यांमुळे महायुतीचं पितळ उघडं पडलं, निवडणुकांसाठी पायाला भिंगरी लावून फिरले, पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत...'

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडे राज्यातील मोठंमोठे पदे असल्याने काही घटना समोर आल्या नाहीत. त्यांच्या विरोधात 509 चा गुन्हा दाखल करायला हवा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलीय.

Chandrakant Patil & Eknath Khadse
Nagpur NCP : आता उमेदवारांनी स्ट्रॉंगरुम समोर झोपायचे का? सुरक्षा धोक्यात, पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार

1980 पासून म्हणजे जवळपास 45 वर्ष मी राजकारणांत आहे. त्याकाळापासून आजपर्यंत माझ्या विरोधात राजकीय गुन्हे वगळता साधी एनसीसुद्धा दाखल नाही. ज्या आमदारावर 307 सारखे मोठे गुन्हे दाखल आहेत त्यांना सराईत गुन्हेगार म्हटले जाते, ज्याच्या विरोधात राजकीय गुन्हे सोडा 307 सारखे मोठे गुन्हे दाखल असल्याने तडीपारीची नोटीसदेखील तयार होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील हेच सराईत गुन्हेगार आहेत, असे उत्तर एकनाथ खडसेंनी दिले आहे.

Chandrakant Patil & Eknath Khadse
Congress Thackeray Alliance : राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी; काँग्रेसच्या देशपातळीवरील मातब्बर नेत्याचे ठाकरेंशी गुफ्तगू, मनसेवर फैसला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com