Congress News  Sarkarnama
महाराष्ट्र

Kapil Patil News : माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Kapil Patil Joined Congress Party : सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Sachin Waghmare

Mumbai Political News: राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन दिवसातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

दुसरीकडे सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता नवी दिल्लीत समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.

समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील (Kapil Patil) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे प्रवेश केला. यावेळेस महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, माजी मंत्री सतेज पाटील उपस्थित होते. यावेळी कॉँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित होते.

माजी आमदार कपिल पाटील हे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्याची तयारी केली असल्याचे समजते.

कपिल पाटील यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने या मतदारसंघातील चित्र बदलणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT