Lok Sabha Election 2019 Opinion Poll Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : उद्यापासून चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया होणार सुरू; पुण्यासह 'या' 11 मतदारसंघांचा समावेश

Sachin Waghmare

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पहिल्या तीन टप्प्यांत जवळपास 24 मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने प्रचार शिगेला पोचला असताना 18 एप्रिलपासून चौथ्या टप्प्यात पुण्यासह 11 मतदारसंघांत लोकसभेची अधिसूचना जारी होणार असल्याने उत्सुकता लागली आहे.

चौथ्या टप्य्यातील अधिसूचना निवडणूक आयोगाकडून (Election Commision) गुरुवारी जारी होणार आहे. उमेदवारांना 18 ते 25 एप्रिल या कालावधीत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. एका उमेदवाराला चार अर्ज भरता येणार आहेत. 26 एप्रिलला उमेदवारी अर्जाची छाननी करता येणार आहे, तर २९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. या ठिकाणी 13 मे रोजी मतदान होणार आहे.

चौथ्या टप्प्यासाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, रावेर, जळगाव या मतदारसंघात लोकसभेची अधिसूचना गुरुवारी जारी होणार आहे. चौथ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील महायुतीचा जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नसल्याने उमेदवाराची घोषणा झालेली नाही.

मराठवाड्यातील जालना व बीड मतदारसंघांतील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराने गेल्या महिनाभरापासून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'या' जागेवरील उमेदवाराची घोषणा रखडलेली

महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या आठ मतदारसंघांतील उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत.

या जागांवरून महायुतीमधील भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात काही जागांवरून वाद असल्याने उमेदवार ठरले नसल्याचे समजते. तर दुसरीकडे मुंबईतील दोन जागेवरील उमेदवार महाविकास आघाडीतील काँग्रेसने (Congress) जाहीर केले नाहीत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT