Yogi Aditynath Sarkarnama
महाराष्ट्र

Foxconn Project : महाराष्ट्राचे राजकारण पेटवणारा प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशच्या झोळीत!

Foxconn Project Maha Maharashtra Uttar Pradesh : राजकीय दबावापोटी प्रकल्प गुजरातला गेल्याची जाहीर टीका आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली होती.

Roshan More

Maharashtra Politics : महाराष्ट्रामध्ये येणार फाॅक्सकाॅन प्रकल्प हा 2022 मध्ये गुजरातला गेल्याने राजकारण पेटले होते. महाविकास आघाडीने यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती. ज्या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचे राजकारण पेटले होते तो तो फाॅक्सकाॅन प्रकल्प अखेर गुजरातला देखील न मिळता उत्तर प्रदेशला मिळाला आहे.

फाॅक्सकाॅन प्रकल्पातून सुमारे एक लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता होती. या प्रकल्पासाठी पुण्याजवळीली तळेगाव एमआयडीसीची जागा देखील निश्चित करण्यात आली होती. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने महायुती सरकारवर टीका करण्यात आली होती.

राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातला गेल्याची जाहीर टीका आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली होती. तर, या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राला देणार असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आरोप प्रत्यारोप सुरू होते.

तीन हजार 700 कोटीची गुंतवणूक

केंद्र सरकारने फॉक्सकॉनचा सहवा सेमी कंडक्टर प्लँट बनवण्यासाठी मंजूरी दिली. तीन हजार 700 कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प उत्तर प्रदेश के यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रीयल झोनमध्ये जेवर विमानतळाच्या जवळ उभा राहणार आहे. 2027 पासून या प्रकल्पातून उत्पन्न सुरू होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT