Supriya Sule On Ncp News Sarkarnama
महाराष्ट्र

Supriya Sule On NCP : कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लहान मुलालाही माहीत आहे `राष्ट्रवादी` म्हणजे शरद पवार...

Sharad Pawar News : राष्ट्रवादीत कुठलेही भांडण नाही किंवा फूट पडलेली नाही.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कुणाचा? चिन्ह कुणाला मिळणार हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहाेचला आहे. (NCP News) या संदर्भात येत्या ६ तारखेला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाचे आपल्याला समन्स मिळाले असून, आपण सुनावणीला वकिलांसह हजर राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आपण निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडू, असेही पवारांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पक्षातील फूट आणि चिन्ह कुणाला मिळणार? या संदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारला. तेव्हा राष्ट्रवादीत कुठलीही फूट पडलेली नाही, (Sharad Pawar) शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे चिन्ह जाण्याचा प्रश्नच नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लहान मुलालाही माहीत आहे, (NCP) राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, असे त्यांनी ठणकावून सांगितले. शिवसेनेच्या फुटीनंतर राष्ट्रवादीतही बंड झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट सत्तेत जाऊन बसला. दोन्ही गटांकडून पक्ष आणि चिन्हावर दावे सांगितले जात आहेत. हा वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहाेचला आहे.

येत्या ६ तारखेला या संदर्भात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः या वेळी हजर राहणार आहेत. वकिलांसोबत आपण सुनावणीला जाऊन बाजू मांडणार असल्याचे पवारांनी माध्यमांना सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला मिळणार, की शरद पवारांकडेच राहणार याची चर्चा सुरू झाली आहे.

माध्यमांनी खासदार सुप्रिया सुळे यांना या संदर्भात प्रश्न केला, तेव्हा राष्ट्रवादीत कुठलेही भांडण नाही किंवा फूट पडलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्षच शरद पवारांनी स्थापन केलेला आहे, त्यामुळे चिन्ह कुठे जाण्याचा प्रश्नच नाही. कश्मीर से कन्याकुमारी तक बच्चा बच्चा जाणता है, राष्ट्रवादी याने शरद पवार, असेही सुप्रिया सुळे यांनी निक्षूण सांगितले. आता दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात असले तरी याचा अंतिम फैसला निवडणूक आयोगच करणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT