Pankaja-Bawankule Visit : पंकजा मुंडेंनी भेटीसाठी आलेल्या बावनकुळेंना दीड तास ठेवले वेटिंगवर?

Maharashtra Bjp News : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पंकजा मुंडेंशी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची होती.
Pankaja Munde-Chandrashekhar Bawankule
Pankaja Munde-Chandrashekhar Bawankule Sarkarnama

Mumbai News : ‘आता अति झालं, पंकजाताईंनी पक्ष सोडला पाहिजे,’ अशी भावना कार्यकर्ते खासगीत व्यक्त करतात. तसेच ‘पंकजाताई अजूनही हवेतच आहेत, त्यांनी जमिनीवर यायला हवे,’ अशीही प्रतिक्रिया काहीजण देतात. अशा टोकाचा भूमिका दोन्ही बाजूंनी का येतात? तर भाजपच्या अंतर्गत गोटात सर्वकाही आलबेल आहे, असे दिसत नाही. भाजपत पंकजा मुंडेंची घालमेल सुरू आहे. त्यातूनच आता एका घटनेची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंकजा मुंडेंना भेटण्यासाठी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी पंकजांनी बावनकुळेंना लवकर भेट न देता सुमारे दीड ते दोन तास ताटकळत ठेवले होते. याबाबत बोलणं काहीजण टाळत आहेत. मात्र, त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली. (Pankaja Munde kept the Bawankules who came for a visit for one and half hours on waiting?)

पंकजा मुंडे या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार होत्या. पण, त्या विचार करून बोलत नाहीत, अशी भावना राज्यातील भाजपश्रेष्ठींच्या मनात रुजली आणि तेव्हापासून त्या बाजूला फेकल्या गेल्या. त्यातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, मग तर पक्षाला सबळ कारणच मिळाले. बाहेरच्या पक्षांमधून आलेल्या अनेक नेत्यांचे भाजपने पुनर्वसन केले, मंत्रिपदे दिली. अनेकांच्या मागे लागलेला चौकशांचा ससेमिरा थांबवला. पण स्वपक्षातील मास लीडर असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केले.

Pankaja Munde-Chandrashekhar Bawankule
Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकर म्हणाले; ‘ज्यांना संविधानाची माहिती नाही, त्यांच्या दबावाला...’

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीपूर्वी पंकजा यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पंकजा यांच्यासह भाजपलाही त्याचा फायदा झाला होता. असे असले तरी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना हे नक्कीच खुपले असणार. वडील (कै.) गोपीनाथ मुंडे यांचा समृद्ध वारसा त्यांच्या मागे आहे. वडिलांची पुण्याई किती दिवस चालणार, असाही संदेश पक्षांतर्गत विरोधकांकडून पद्धतशीरपणे खालपर्यंत देण्यात आला. दुसऱ्या बाजूला याच नेत्यांनी अन्य पक्षांतील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मंत्रिपदे दिली. पंकजा मुंडे यांना मात्र विविध निकष लावण्यात आले.

Pankaja Munde-Chandrashekhar Bawankule
Vikhe Vs Thorat : ‘समन्यायी’ पापाची जबाबदारी तुमचीच; विखेंनी डागली थोरातांवर तोफ!

पंकजा मुंडे यांनी नुकतीच शिवशक्ती परिक्रमाही केली. तीही पक्षांतर्गत विरोधकांच्या पचनी पडलेली दिसत नाही. पक्षाने अशी मोठी कोंडी केलेली असूनही पंकजा या नमते घ्यायला किंवा शरण यायला तयार नाहीत. कारण त्यांचा वारसाच संघर्षाचा आहे. पंकजा यांच्यामागे ओबीसी समाजाची मोठी ताकद आहे. बावनकुळेही ओबीसी नेते आहेत. वर्चस्वाच्या भावनेतून हा प्रकार घडला असावा, असे बोलले जात आहे.

वरळी येथील पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी बावनकुळे हे गेले होते. त्यांना एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची होती. पंकजाताई घरीच होत्या. काही कार्यकर्तेही त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते. पंकजाताईंनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्वरित भेट न देता तास ते दीड तास ताटकळत ठेवले होते, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. या प्रकारामुळे आणखी एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंकजा मंडे यांचा पक्षांतर्गत संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. गेल्या निवडणुकीत परळी येथून पंकजाताईंचा पराभव करणारे त्यांचे बंधू धनंजय मुंडे हेही अजितदादांसोबत सत्तेत सहभागी असून, कॅबिनेट मंत्री आहेत. स्टँडिंग आमदार म्हणून परळीची जागा धनंजय मुंडेंना सुटण्याची शक्यता आहे.

Pankaja Munde-Chandrashekhar Bawankule
Income Tax Raid : खासदार राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या सूतगिरणीवर इन्कम टॅक्सचे छापे; ठाकरे गटात खळबळ

पंकजाताईंचे खच्चीकरण करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधकांना हा आयताच मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे पंकजाताईंनी आता पक्ष सोडावा, आणखी अपमान सहन करू नये, असे त्यांच्या मतदारसंघाबाहेरील कार्यकर्ते बोलत आहेत. यावरून त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भावना किती तीव्र असेल, याचा अंदाज यावा. सुमारे १९ कोटी रुपये जीएसटी थकवला म्हणून पंकजाताईंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. त्याप्रसंगीही कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्याचे दिसून आले होते.

Pankaja Munde-Chandrashekhar Bawankule
Vasant More To Pawar : भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंनी डागली तोफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com