Mudra Loan: राज्यातल्या सर्वच भागातील साखर कारखान्यांनी वाहतूकदारांच्या कागदपत्रांचा वापर करुन हा घोटाळा केल्याचं साम टीव्हीच्या तपासात उघड झालं आहे. पण नेमक्या कुठल्या कारखान्यांनी आणि कसा हा घोटाळा केला हे जाणून घेऊयात. साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे दिसून आलं आहे.
राज्यात सुमारे सव्वालाख वाहतूकदार आहेत जे साखर कारखान्यांसाठी काम करतात. या वाहतूकदारांची फसवणूक झाली असून परराज्यातून या वाहतूकदारांच्या नावावर साखर खारखान्यांनी मुद्रा लोन काढल्याचं उघड झालं आहे. ही कर्जे महाराष्ट्रातील बँकांमधून नव्हे तर कर्नाटकातील राष्ट्रीयकृत बँकांच्या खात्यांमधून ६ ते ३५ लाखांपर्यंतची प्रचंड कर्जे काढण्यात आली आहेत. या ऊस वाहतूकदारांकडून टेंडरसाठी घेतलेली पॅनकार्ड आणि पासबूक वापरुन परराज्यातील बँकांमधून कर्ज काढण्यात आली आहेत. यामुळं राज्यभरातील तब्बल ४०,००० वाहतूकदार अडचणीत आले आहेत. यामुळं त्यांचा सिबील स्कोअरही खराब झालं आहे.
या वाहतुकदारांना विविध कारणांसाठी वारंवार कर्जे घ्यावी लागतात, अशीच कर्जे घेण्यासाठी जेव्हा ते बँकेत गेले तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली. कारण बँकांनी त्यांना सांगितलं की, आधीच तुमच्या नावावर कर्जे घेण्यात आली आहेत. यानंतर या वाहतुकदारांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. ज्या साखर कारखान्यांकडं सध्या हे वाहतूकदार काम करत आहेत त्याच कारखान्यांनी ही कर्जे उचलली आहेत.
सुमारे १००० ते १५०० कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचारातून आम्हाला मुक्त करा आणि या कारखान्यांवर कारवाई करा अशी मागणी आता या वाहतूकदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली आहे. वाहतूकदारांची संख्या सुमारे सव्वालाख इतकी आहे. त्यामुळं हे प्रकरण किती मोठं आणि गंभीर आहे, याची कल्पना येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.