Naxalism Gadchiroli Sarkarnama
महाराष्ट्र

Naxalism Gadchiroli : रणांगणात गडचिरोलीचा दबदबा! शौर्यपदकांवर जवानांची मोहोर

31 Gadchiroli Police Officers Awarded President Gallantry Medal for Fighting Naxals : एकाच मोहिमेत 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश आले होते.

Pradeep Pendhare

Naxal fight Maharashtra : नक्षलवाद्यांशी दोन हात करत, दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या गडचिरोली पोलिस दलाच्या शौर्यावर राष्ट्रपतींनी पुरस्कारांची मोहोर उमटवली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या एकूण 121 शौर्य पदकांपैकी 31 पदके एकट्या गडचिरोलीच्या जवानांना मिळाली आहेत. पद्म पुरस्कारांबरोबरच देशसेवेत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पुरस्कारांची घोषणा झाली.

राज्यातील नक्षली (Naxal) भाग म्हणून गडचिरोली ओळखला जातो. इथं नक्षलवाद्यांचं नेहमीच उग्र रूप असते. पोलिसांनी नेहमीच अलर्ट राहावं लागतं. केंद्रातील मोदी सरकारने अन् राज्यातील महायुती सरकारने नक्षलविरोधी चळवळींविरोधात अलीकडच्या काळात जोरदार मोहीम उघडली आहे. नक्षलींविरोधात पोलिसांशी थेट चकमक होत आहे. देशाच्या कर्तव्यात, पोलिसांना नक्षलींविरोधातील कारवात मोठं यश मिळत आहे.

गडचिरोलीमधील (Gadchiroli) भामरागड तालुक्यातील बोरीया-कसनासूरच्या घनदाट जंगलात, 22 एप्रिल 2018मध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या एकाच मोहिमेत 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश आले. नक्षलविरोधी अभियानातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई मानली जाते.

या मोहिमेत पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, विलास पोरतेट, संतोष नैताम यांच्यासह 31 जवानांच्या कामगिरीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. शौर्य पदकांसोबतच 394 पोलिस अंमलदारांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे.

यामध्ये कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या 14 शहीद जवानांचाही मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. शहीद झालेल्या 7 हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी, तर 7 पोलिस नाईकांना पोलिस हवालदार पदी मरणोत्तर पदोन्नती देण्यात आली आहे.

याशिवाय 10 जवानांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. यामध्ये 82 हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून, तर 303 पोलिस नाईकांना पोलिस हवालदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT