Shinde Vs Naik : "किल्ले कोणाचे नसतात; पक्षाने एक इशारा केला तर यांचे नामोनिशाण पुसून टाकेन" : गणेश नाईक पुन्हा भिडले

Ganesh Naik Targets Eknath Shinde in Thane BJP vs Shiv Sena Clash : भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्हा इथं दौऱ्यावर जात शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Ganesh Naik Targets Eknath Shinde
Ganesh Naik Targets Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

BJP vs Shiv Sena : भाजप मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात जाऊन डिवचलं आहे. 'आताही पक्षाने जर एक इशारा केला, तर यांचे नामोनिशाण पुसून टाकेन,' असा पुनरुच्चार मंत्री नाईक यांनी करत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

भाजपचे गणेश नाईक म्हणाले, "मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षाचा महापौर नवी मुंबईत झाला. मिरा-भाईंदरमध्ये महापौर बसवला. ठाण्यातील यश थोडक्यात गेले." पण जिल्हा बँक असो वा, जिल्हा परिषद सर्वत्र विजय मिळवला. त्यामुळे किल्ले कोणाचे नसतात, असा टोला देखील नाईक यांनी शिंदेंना (Eknath Shinde) लगावला.

ठाण्यातील वंदे मातरम् संघ आयोजित माघी गणेश जन्मोत्सवात गणपती दर्शन मंत्री गणेश नाईक यांनी केलं. ते म्हणाले, "नेत्याला जशी खासदारकी, आमदारकी मिळते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी. यासाठी महायुती (Mahayuti) करण्याऐवजी प्रत्येकाने आपले घोडे मैदानात आणावेत."

Ganesh Naik Targets Eknath Shinde
Modi Government Padma Award : ‘अपमानाचा सन्मान’ भाजपचा कारनामा! कोश्यारींना 'पद्म'वरून राऊत आगपाखड

'हे राजकीय युद्ध संपल्यानंतर महायुतीतील सगळे नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालणारे भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस यातून ज्याचे नगरसेवक जास्त त्याला संधी देण्यात यावी. त्याप्रमाणे दुसरी पदे वाटता आली असती,' असे आपले व्यक्तिगत मत असल्याचे सांगत, त्यावर पक्षश्रेष्ठींनी निर्णय दिलेल नाही,' असे मंत्री नाईक यांनी म्हटले.

Ganesh Naik Targets Eknath Shinde
Chandrapur mayor election: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; ठाकरेंचा महापौर बसणार? 'मातोश्री'वरील बैठकीत नगरसेवक अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर ठाम

...तर भाजपचे महापौर झाले असते

महायुती झाली नसती, तर ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत भाजपचा महापौर झाला असता. भाजपच्या घोड्याची लगाम खेचली गेल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील कार्यकर्ते खूश नाहीत. केवळ पक्षशिस्त म्हणून कार्यकर्ते शांत आहेत, असेही त्यांनी सध्या सुरू असलेल्या महापौर पदाच्या वादावरून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com