Maharashtra Forest Department controversy; ganesh naik, shrikant shinde And Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Thane controversy : गणेश नाईकांचा सरकारला घरचा आहेर, “बिबट नाही सांभाळता आला अन्, वाघाच्या...” म्हणत शिंदेंचा पलटवार

shrikant shinde criticism over ganesh naik controversy : ठाण्याच्या राजकारणात सध्या वन मंत्री गणेश नाईक विरूद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद पेटला आहे. आता या वादात खासदार श्रीकांत शिंदे यांनी उडी घेतली असून त्यांनी विभागाच्या कारभारावरच खडे बोल सुनावले आहेत.

Aslam Shanedivan

  1. वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निलेश राणेंनंतर आता श्रीकांत शिंदे यांनीही टीका केली आहे.

  2. वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजकीय वातावरण तापले आहे.

  3. या वक्तव्यांमुळे सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद चर्चेत आले आहेत.

Thane News : गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद होताना दिसत आहे. नाईक सतत शिंदेंना टार्गेट करताना दिसत आहेत. यावरून शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. नुकताच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा थेट अधिवेशनातच हल्लाबोल करत वन विभागाच्या कामाच्या वाभाडे काढले होते. तोच आता एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह वन विभागाच्या कारभारावर तोफ डागली आहे. तसेच वनमंत्री गणेश नाईक यांना बिबटे हे शाकाहारी आहेत की मांसाहारी हे माहित करून घेत वनखात्याचा कारभार पाहावा असे खोचक सल्ला दिला आहे. यामुळे आता आणखी हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला होता. तर आपण जोपर्यंत वनमंत्री म्हणून कारभार पाहू तोपर्यंत जंगलाची किंचितही जागा देणार नाही असा दम भरला होता. तर शिंदे यांच्या खासदार सुपुत्राला माजी करू असेही वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांसह श्रीकांत शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचा समाचार घेतला होता.

यानंतर आता गणेश नाईक यांना पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांनी डिवचले असून खडे बोल सुनावले आहेत. तसेच त्यांच्या खात्याच्या कारभारावरच प्रश्नचिन्हं उभे केले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होतोय अशी टीका करत गणेश नाईक यांनी सरकारला घरचा आहेर दिला होता. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

याच मुद्द्यावरून आता श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यांसह त्यांच्याकडे असणाऱ्या वनविभागाच्या कारभारासंदर्भात थेट सवाल करत टोला लगावला आहे. राज्यातील वनविभागात नेमका काय प्रकार सुरू आहे याबाबत आपल्या कानावर आलं असून, त्यावर आपण फार काही बोलत नाही. मात्र, वनखात्याला पैसे कमी पडत असल्यामुळे आता सागाची झाड तोडायची म्हणतात. त्यातून पैसे घ्यायचे म्हणतात. याची माहिती मिळवणे गरजेचे आहे.

पण नुकताच बिबट्याची दहशत पाहता जंगलात शेळ्या सोडू अशी घोषणा त्यांनी केली होती. पण आता त्यांच्याकडून फळझाडे लावू अशा घोषणा होताना दिसत आहेत. यामुळेच बिबटे शाकाहारी आहेत की मांसाहारी हे आधी त्यांनी माहित करून घ्यावी. आणि मगच वनखात्याचा कारभार पाहावा असा खोचक टोला श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे. तसेच ‘बिबट नाही सांभाळता येत, कुठं वाघाच्या नादी लगता, असाही निशाणा साधला आहे.

श्रीकांत शिंदे यांनी, ‘जेवढं झेपत तेवढं बोललं पाहिजे. कोत्या मनासारखं चाललय सगळं, मलाच मिळालं पाहिजे अशी वृत्ती आहे. युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं नाही पाहिजे’ असेही म्हटलं आहे. तर परिवहन खात्याचा विषय काढलात तर, आमचही सगळ्यावर बारीक लक्ष असून इथे हुकूमशाहीचं राज्य नाही. नवी मुंबई महापालिका जिंकली म्हणून काहीजण फुशारक्या मारत आहेत. पण तो निसटता विजय होता हे लक्षात ठेवावं. ‘हम हम है, बाकी सब पानी कम है’ अशा शब्दातही श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना सुनावलं आहे.

FAQs :

1. गणेश नाईकांवर टीका कोणी केली आहे?
निलेश राणेंनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही त्यांच्या कारभारावर टीका केली आहे.

2. वादाचा मुख्य मुद्दा काय आहे?
राज्यातील वनविभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

3. या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद उघड होण्याची शक्यता आहे.

4. ‘बिबट नाही सांभाळता येत’ हा टोला कशावरून आहे?
वनविभागाच्या कामकाजावर अप्रत्यक्ष टीका करत हा राजकीय टोला लगावण्यात आला.

5. पुढे काय घडू शकते?
या प्रकरणात आणखी वक्तव्ये आणि राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT