Ganesh Naik vs Shinde clash: येत्या निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा सगळी खुमखुमी उतरवतो; गणेश नाईकांवर श्रीकांत शिंदेंचा पलटवार

Navi Mumbai civic election controversy News : नवी मुंबई व ठाण्यातील महापालिका निवडणुकीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
Ganesh Naik-Shrikant Shinde
Ganesh Naik-Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद रंगला आहे. नवी मुंबई व ठाण्यातील महापालिका निवडणुकीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच दोन दिवसापूर्वीच गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांना देखील माजी करून टाकू, त्यांचे राजकीय अस्तित्व मिटवून टाकू असा इशारा दिला होता.

यानंतर नवी मुंबईतील ऐरोली येथे शिवसेनेच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार शिंदे यांनी या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर देत जर एवढीच खुमखुमी असेल तर येत्या निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा, मग सगळी खुमखुमी उतरवतो, असा थेट इशारा नाईक यांना दिला आहे. शिंदे यांच्या टीकेनंतर आता त्याला नाईक काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गणेश नाईक यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या वादात आता खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी गणेश नाईक यांच्या वनखात्याच्या कारभाराला चांगलेच लक्ष्य केले आहे. वनखात्यांच्या कारभाराबाबत अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. वन खात्याकडे पैशाची कमतरता असल्याने जंगलातील सागाची झाड तोडून त्यातून पैसे कमावणार आहेत, असे वक्तव्य करत खासदार शिंदे यांनी राज्याच्या वनखात्यावरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Ganesh Naik-Shrikant Shinde
BJP Politics : भाजपची मोठी खेळी; मित्रपक्षाचे नामोनिशाण मिटविणार, राज्यसभा निवडणुकाआधी थेट विलीनीकरणाचा डाव

यापूर्वी एका कार्यक्रमातून वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सातत्याने लक्ष्य केले आहे. यातच गणेश नाईक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील माजी करून टाकू, त्यांचे राजकीय अस्तित्व मिटवून टाकू असा इशारा दिला होता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. दुसरीकडे गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेला शिंदे काय उत्तर देणार याकडे लाख लागले होते. त्यातच संधी मिळताच श्रीकांत शिंदे यांनी वन विभागाचा गैरकारभार चव्हाट्यावर आणला आहे.

Ganesh Naik-Shrikant Shinde
Shivsena UBT News : आधी नगरसेवक होईन, मगच लग्न; उद्धव ठाकरेंचा शिलेदाराला फोन, आता चांगली मुलगी बघ!

काही दिवसांपूर्वी बिबट्यांना जंगलातच रोखण्यासाठी जंगलात शेळ्या बकऱ्या सोडण्यात येतील, असे काही जणांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता तेच म्हणत आहे की जंगलात फळझाड लावू आणि बिबट्यांना रोखू. पहिले हे नक्की करा की बिबटे हे शाकाहरी आहेत की मांसाहारी. त्यामुळे आधी जंगलातील बिबटे सांभाळा मग शिवसेनेच्या वाघांच्या नादी लागा, असा इशारा ही त्यांनी नाईकांना दिला.

Ganesh Naik-Shrikant Shinde
Congress Leader : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार, माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेला खासदार शिंदे यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. जर एवढीच खुमखुमी असेल तर येत्या निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा, मग सगळी खुमखुमी उतरवतो, असा थेट इशारा नाईक यांना दिला आहे. शिंदे यांच्या टीकेनंतर आता त्याला गणेश नाईक काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ganesh Naik-Shrikant Shinde
BJP Politics : भाजपची मोठी खेळी; मित्रपक्षाचे नामोनिशाण मिटविणार, राज्यसभा निवडणुकाआधी थेट विलीनीकरणाचा डाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com