Gokul Election News Sarkarnama
महाराष्ट्र

Gokul chairman election : गोकुळवर कोणाची सत्ता? आज फैसला होणार : अध्यक्ष निवडीपूर्वी वातावरण तापणार, 600 पोलिसांचा बंदोबस्त तैनात

Gokul Mahayuti vs Samvichari Aghadi : गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटांचे कार्यकर्ते गोकुळ शिरगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. सकाळपासूनच गोकुळ शिरगाव परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 10 Nov : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज (मंगळवारी) होणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष होणार की समविचारी आघाडी बाजी मारणार, याचा फैसला आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तब्बल ६०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोकुळमधील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीसाठी दोन्ही गटांचे कार्यकर्ते गोकुळ शिरगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. सकाळपासूनच गोकुळ शिरगाव परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.

अध्यक्षपदासाठी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मात्र, महायुतीमध्ये अद्याप अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर एकमत झालेले नाही. महायुतीमध्ये अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यास माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेला संधी मिळाल्यास अजित नरके यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. तर भाजपकडे अध्यक्षपद गेल्यास डॉ. चेतन नरके यांना संधी मिळू शकते.

त्यामुळे आजच्या निवडणुकीत महायुती आपला उमेदवार निवडून आणणार की समविचारी आघाडी सत्तेवर येणार, याची उत्सुकता आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते गोकुळ शिरगाव येथे जमणार असल्याने पोलिसांसमोरही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असणार आहे. ६०० हून अधिक पोलिसांच्या बंदोबस्तामुळे गोकुळ परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT