Gokul dairy case update : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडणुकीबाबत आताची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. शासननियुक्त चार सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार देणाच्या वटहुकूमाला स्थगिती देण्याची मागणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या गटाकडून करण्यात आली होती. मात्र, ही मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
सतेज पाटील यांच्यासाठी हा पहिला मोठा धक्का आहे. कोर्टाने यापूर्वी अध्यक्ष निवडणुकीबाबत दिलेल्या आदेशानुसारच मंगळवारी (ता. १०) निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये शासननियुक्त चार संचालकांनाही मतदान करता येणार आहे. मात्र, या संचालकांनी केलेल्या मतदानाच्या मतपत्रिकांसाठी स्वंतत्र मतपेटी असेल.
गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सर्व २९ संचालकांचे मतदान ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया कोर्टाच्या अंतिम निकालावर अवलंबून असणार आहे. कोर्टाने मतदान न करू देण्याची मागणी फेटाळली असली तरी अद्याप वटहुकूमावरही अंतिम निकाल दिलेला नाही. अंतिम निकालावरच मंगळवारच्या अध्यक्षपदाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यासाठी चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, आज संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून सतेज पाटील यांनी सरकारच्या वटहुकूमाला जोरदार विरोध केला होता. मात्र, आता कोर्टाच्या आदेशानुसार मंगळवारी चार सदस्यांना मतदान करता येणार आहे. परिणामी, महायुती वरचढ ठरणार असून महायुतीचा अध्यक्ष होणार, अशी शक्यता आहे.
कोण आहेत चार संचालक?
सतेज पाटील यांनी चार तज्ज्ञ संचालकांची नावे संघर्ष मोर्चामध्ये जाहीर केली. ते म्हणाले, सरकारने वटहुकूम काढल्यानंतर काल रात्री दुग्धविकास विभागाने जीआर काढला. पण तो अपलोड केलेला नाही. चार नावे त्यांनी स्वीकृत म्हणून पाठविली आहेत. शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, कृष्णात पाटील आणि अॅड. प्रशांत पाटोळे ही नावे तज्ज्ञ संचालक म्हणून निश्चित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.