milk  Sarkarnama
महाराष्ट्र

Gokul Milk Rate: गोकूळ दुधाचे दर वाढले! ग्राहकांच्या खिशावर ताण, म्हशीच्या दुधासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

Gokul Milk Rate: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाची अर्थात गोकूळची निवडणूक येत्या दोन महिन्यात पार पडणार आहे, या निवडणुकीच्या तोंडावर ही दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.

Rahul Gadkar

Gokul Milk Rate: गोकुळ दूध संघाने गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्रीच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार गायीच्या दुधासाठी २ रुपये प्रतिलिटर आणि म्हशीच्या दुधासाठी १ रुपया प्रतिलिटर इतकी खरेदीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. येत्या काळात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकूळची निवडणूक पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर आपल्या सदस्य शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. तसंच दुसरीकडं विक्रीच्या दरातही वाढ करण्यात आल्यानं याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या बसणार आहे. गोकुळ संचालकांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

खरेदीचा दर वाढला

गोकूळ दूध संघाकडून गायीच्या दूध खरेदीच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळं यापूर्वी गायीच्या दुधाचा खरेदीचा दर हा ३४ रुपये होता तो आता ३६ रुपये इतका झाला आहे. तर म्हशीच्या दुधाच्या दरात १ रुपयानं वाढ केल्यानं आधी हे दूध ५२.५० रुपयांनी खरेदी केलं जायचं ते आता ५३.५० रुपये प्रति लिटरनं खरेदी केलं जाणार आहे.

विक्रीचा दर वाढला

तर दुसरीकडं गायीच्या दुधाच्या विक्रीच्या दरात एक रुपयानं वाढ केली आहे. तर म्हशीच्या विक्रीच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. कोल्हापुरात सध्या म्हशीचं दूध ६८ रुपयांनी विकलं जात ते आता ७० रुपये प्रतिलिटर दरानं विकलं जाणार आहे. महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात गायीच्या आणि म्हशीच्या दुधाचे दर वेगवेगळे आहेत, त्यानुसार सध्याच्या दुधाच्या दरात वरील प्रमाणं वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

प्रतिदिन १७ लाख लिटर दूध संकलन

दरम्यान, गोकुळ संलग्न ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून सुमारे १७ लाख लिटर प्रतिदिन संकलन केलं जातं. गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असं गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT