Narayan Chaudhari: भिवंडी महापालिकेत काँग्रेसनं भाजपला चांगलाच हात दाखवला आहे. भाजपचे ९ नगरसेवक फोडून काँग्रेसनं सत्तास्थापन केली असून काँग्रेस सेक्युलर फ्रन्टचा महापौर म्हणून नारायण चौधरी यांची निवड झाली आहे. त्यामुळं अत्र-तत्र-सर्वत्र भाजपनं ज्या काही राजकीय तोडफोडी केल्यात तसंच उत्तर काँग्रेसनं भिंवडीत भाजपला दिलं आहे. त्यामुळं भाजपला मोठा धक्का बसला असून या फुटलेल्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशाराही भाजपकडून देण्यात आहे.
दुसरीकडं चंद्रपुरात भाजपनं शिवसेनेचा नगरसेवक फोडून सत्ता काबीज केल्याचा बदला आता भिंवडीत काँग्रेसनं घेतल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, महापौरपदी विराजमान झाल्यानंतर नारायण चौधरी यांनी भाजपला इशारा दिला आहे. "देव तारी त्याला कोण मारी" अन् "सोच बदलो, भिवंडी बदलेगा" असं या फुटलेल्या नगरसेवकांनी म्हटलं आहे.
नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करत महापौरपदी विराजमान झाल्यानंतर नारायण चौधरी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मी सर्व भिवंडीच्या जनतेला धन्यवाद देतो, मला एवढं मोठं पद तुम्ही दिलं त्याचा मी स्विकार करतो. मी शहराचा महापौर झालो आहे, त्यामुळं आता विरोधकांकडून मिरची-मसाला नको, फक्त विकासावर बोलावं. महापौरपदाच्या निवडणुकीत ४८ मतं पडली याचा विश्वास होता का? या प्रश्नावर चौधरी म्हणाले, "देव तारी त्याला, कोण मारी". हा सेक्युलर फ्रन्टचा विजय आहे. भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. यासाठी आमदार रईस शेख यांनी खूप मेहनत घेतली त्यांचेही आभार.
दरम्यान, भाजपनं काढलेल्या व्हीपच उल्लंघन केल्यानं नवनिर्वाचित महापौरांसह भाजपच्या ६ नगरसेवकांवर कारवाईचा इशारा भाजपनं दिला आहे. यावर मात्र महापौरांना बोलणं टाळलं. तर "सोच बदलो भिवंडी बदलेगा" अशा शब्दांत दुसऱ्या एका नगरसेवकानं यावेळी म्हटलं. तसंच २२ नगरसेवक असतानाही बलाढ्य भाजपला या निवडणुकीतून बाजुला ठेवलं याबाबत बोलताना म्हणाले नगरसेवक म्हणाले, "आम्ही कोणालाही बाजुला ठेवलेलं नाही. आम्ही तोडणारे लोक नाहीत तर जोडणारे लोक आहोत"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.