Gopichand Padalkar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार,माजी मंत्री जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात गोपीचंद पडळखर यांचे नाव न घेता मंगळसुत्र चोरावर मी बोलत असतो असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे.
'जयंत पाटील हा मुळात बिनडोक माणूस आहे. तो छोटा दरोडा टाकत नाही राज्यातल्या अनेक कारखान्यांवर यांनी दरोडा टाकला आहे. मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे आणि हा एका चोराच्या पोटी जन्माला आला आहे.हा दोनशे पाचशे कोटीच्या पुढचा दरोडा टाकणारा दरोडेखोर आहे.', अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले, 'आता जतमध्ये येऊन एकी करून मला थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मत चोरी झाली असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे मग 1990 पासून सलग मत चोरी करून ते निवडून येत आहे का?इतका काय दिवा लावला याने जो सलग इतके टर्म निवडून आला. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन लढायला किंमत लागते ती हिंमत जयंतराव पाटील यांच्यात नाही.'
'माझ्यावर त्यावेळी कशा पद्धतीने आरोप झाले हे सगळ्यांना माहिती आहे. मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे. हा जयंतराव पाटील छोटा दरोडा टाकत नाही राज्यातल्या अनेक कारखान्यांवर यांनी दरोडा टाकला आहेसंभाजी पवार आप्पा यांचा कारखाना जयंत पाटील यांनी ठापला आहे.'
गोपीचंद पडळकर म्हणाले, 'ज्या कार्यक्रमात जयंतराव पाटील बोलला तो कार्यक्रम ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाचा होता. जयंत पाटलांची भूमिका हिंदू विरोधी भूमिका आहे. इस्लामपूरचे ईश्वरपूर करताना देखील या माणसाने विरोध केला. उरण ईश्वरपूर करा असं याचं म्हणणं आहे पण नोटिफिकेशन निघाल्यानंतर उरण ईश्वरपूरच होणार आहे इतकं सुद्धा या फॉरेन रिटर्न माणसाला कळत नाही का? न शिकलेल्या आमच्या मेंढपाळाला सुद्धा हे कळतं मग याला कळत नाही का? हजामती करतो का? इतकंही कळत नाही महाराष्ट्रात इतकी वर्ष दाढ्या केल्या का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.