Manoj Jarange Patil : "जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांचा आमच्याकडे कच्चाचिठ्ठा" : भाजप मंत्र्याचा मोठा दावा

Pankaj Bhoyar's Shocking Claims on Maratha Protest : "मराठा समाजाच्या आंदोलनावर चर्चेतून मार्ग निघावा ही राज्य सरकारची भूमिका आहे. मात्र, हे करताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. तसंच आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी मराठा आंदोलकांनी घ्यावी."
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange On Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Protest Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून त्यांची तब्येत खालवली आहे. अशातच त्यांनी आजपासून पाणी देखील न पिण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे सरकाकडून देखील हालचालींना वेग आला आहे. एकीकडे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मराठा आंदोलनावर भाष्य करताना एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोणाची रसद आहे, याची माहिती आमच्या नेतृत्वाकडे असून योग्यवेळी त्याचा खुलासा आमच्या नेतृत्वाकडून केला जाईल असा इशाराही गृहराज्यमंत्री तथा भाजप नेते पंकज भोयर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange On Devendra Fadnavis
Maratha Reservation Video : मराठा आरक्षणप्रश्नी सरकारच्या हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी रात्रीच घेतली बैठक, ॲडव्होकेट जनरलही उपस्थित

तर मराठा समाजाच्या आंदोलनावर चर्चेतून मार्ग निघावा ही राज्य सरकारची भूमिका आहे. मात्र, हे करताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये असंही पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी मराठा आंदोलकांनी घ्यावी.

हुल्लडबाज आंदोलकांवर पोलिसांची नजर आहे, असंही गृहराज्यमंत्री म्हणाले. याचवेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोणाची रसद आहे, याची माहिती आमच्या नेतृत्वाकडे असल्याचा दावा केला. शिवाय योग्यवेळी आमचे नेतृत्व त्याचा खुलासा करेल, असंही भोयर म्हणाले.

Manoj Jarange On Devendra Fadnavis
BJP Leader On Maratha Reservation Protest: वादग्रस्त वक्तव्यांमुळे आंदोलन चिघळतंय? मराठा समाज अधिक आक्रमक होतोय?

त्यांच्या या वक्तव्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला खरंच कोणाची रसद आहे का? आणि असेल तर भाजपचे नेतृत्व म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर शांत का आहेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com