Gotya Gitte News : सहदेव सातभाई खून करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराड समर्थक रघुनाथ फड गँगवर मकोका लावण्यात आला होता. यामध्ये वाल्मिक कराडचा राईड हँड समजला जाणारा गोट्या गित्तेवर देखील कारवाई करण्यात आली होती. मात्र, अपर पोलिस महासंचालकांनी फड गँगमधील पाच जणांवर मकोका रद्द केला आहे. यामध्ये गोट्या गित्तेचा देखील समावेश आहे.
सातभाईंवर हल्ल्या प्रकरणी सात जणांना आरोपी करण्यात आले होते, त्यातील गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते यांच्यावरील मकोका हटवण्यात आला आहे. तर, गँगचा मोरक्या रघुनाथ फड आणि धनराज फड यांच्यावरील मकोका कायम ठेवण्यात आला आहे.
गोट्या गित्तेवरील मकोका रद्द झाला आहे मात्र तो अजुनही तो या प्रकरणात फरारी आहे. अचनाक त्यावरील मकोका रद्द झाल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रशासन आणि पोलिसांनी नेमका हा निर्णय नेमका का घेतला अशा प्रश्न देखील विचारण्यात येत आहे. तसेच आता सातभाई यांच्यावरील हल्ला प्रकरणात न्याय मिळणार का याची देखील चिंता व्यक्त केली जात आहे.
सहदेव सातभाई यांच्यावर 18 ऑक्टोबर 2023 मध्ये हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी लोखंडी राॅड, फरशी आणि काठीने त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात सातभाई गंभीर जखमी झाले होते. हल्लेखोरांनी त्यांच्या खिशातील दोन लाख रुपये देखील काढून घेतले होते. या प्रकरणात बालाजी दहिफळे, विलास गिते, रघुनाथ फड, धनराज उर्फ राजाभाऊ फड यांच्यासह वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गिते तसेच जगन्नाथ फड, संदीप सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.