manoj jarange patil kunbi certificate Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha-Kunbi Certificates : मनोज जरांगेंच्या दाव्यातील सरकारने हवाच काढली; वैध मराठा-कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारीच दाखवली, मराठवाड्यातही तब्बल 20 हजार....

Maratha-Kunbi Certificates Validity Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर सरकारने मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र वैध ठरलेली आकडेवारीच जाहीर केली आहे.

Roshan More

Manoj Jarange News: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत मराठ्यांना मिळालेली कुणबी प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रद्द केली जात असल्याचा आरोप केला आहे. जात पडताळणी समितीकडून तीन जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची जात प्रमाणपत्र रद्द केली होती. त्यावरून जरांगे पाटलांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांनी सरकारला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर सरकारकडून मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वैधतेसाठी किती अर्ज आले आणि किती अवैध ठरवण्यात आले याची आकडेवारीच जाहीर केली आहे. जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरण्याचे प्रमाण अवघे 0.30 टक्के आहे.

ऑक्टोबर 2023 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राज्यातील जात पडताळणी समितीकडे 2 लाख 96 हजार 246 अर्ज आले. त्यापैकी तब्बल 2 लाख 59 हजार 844 प्रमाणपत्र वैध ठरण्यात आली. तर, केवळ 219 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तसेच 10 हजार 843 अर्जांवर निर्णय झालेला नाही. ती अर्ज प्रलंबित आहेत. ही आकडेवारी संपूर्ण राज्यभरातील आहेत.

मराठवाड्यात काय स्थिती?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल,असे सांगितले जात होते. हैद्राबाद गॅझेटच्या नोंदींना मान्यता देण्याच्या निर्णयानंतर मराठा कार्यकर्त्यांना गुलाल उधळून आनंद देखील साजरा केला होता. मराठवाड्यात 20 हजार 143 हजार जात प्रमाणपत्र पडताळणी समिती समोर आले होते. त्यातील 15 हजार 597 प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आली आहेत. केवळ 61 अर्ज नामंजुर करण्यात आले आहेत. शिवाय 1957 अर्जांवर निर्णय प्रलंबित असून २५२८ अर्ज अपुरी कागदपत्रे आणि अन्य कारणाने निकाली काढण्यात आले आहेत.

सरकार मराठा समाजाच्या पाठीशी

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेवर बोलताना महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे म्हणाले, कालही सांगितलं, परवाही सांगितलं अन् आजही सांगतो महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने आहे. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाला न्याय मिळेल तर ओबीसी समाजाला न्याय देताना मराठा समाजालाही न्याय मिळेल याकडे आमचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT