Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा; मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारची बाजू मांडताना थेट मुद्द्यालाच हात घातला

Maratha Reservation Protest: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी(ता.29) अंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी आरक्षणासाठीच्या निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे.
Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी(ता.29) अंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी आरक्षणासाठीच्या निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे. सरकार मराठा समाजाला 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप करत हे आरपारची लढाई जरांगे छेडणार आहे.यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर रोखठोक भाष्य केलं. ते म्हणाले, ज्यांनी ज्यांनी जात प्रमाणपत्र मागितलं आहे, त्यांना ते देण्यात आलं आहे. या बाबतीत प्रलंबित प्रकरणं कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महायुतीच्या सरकारने मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले आहेत, ते या आधीच्या कोणत्याही सरकारने घेतले नाहीत. यातूनही जर काही राहिलं आहे असं कुणाला वाटत असेल तर त्यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल,असंही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी त्यांनी पीक विमा योजनेबाबतही सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, आपण एक रुपयात पीक विमा देतो. त्यामुळे सर्वांनीच तो पीक विमा काढला. पण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोगसगिरी झाल्याचं समोर आलं. त्यावर आपण कारवाई केली. त्यामुळेच आता त्याच्या लाभाची संख्या कमी आली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Congress Vs BJP: सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेस आमदाराला मोठा धक्का,भाजपच्या पराभूत उमेदवाराला दिलासा; निकाल फिरणार?

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर शिंदे समितीने मराठा-कुणबी नोंदींचा शोध घेतला होता. त्यामध्ये तब्बल 58 लाख नोंदी सापडल्या होत्या. मात्र, या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत होती. त्या विरोधात आता मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले असून ते आंदोलन करणार आहेत.

'आपल्याला 29 ऑगस्टला शेवटचं खूप मोठं निर्णायक आंदोलन करायचे आहे. तीन वर्ष हा संघर्ष सुरू आहे. आता मराठ्यांचे प्रश्न बाकी ठेवायचे नाहीत. आपल्या 58 लाख नोंदी सापडल्या. सरकार 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र देत नाही. ही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला हे निर्णायक आंदोलन करायचे आहे.', अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com