Manoj Jarange Patil-CM Devendra Fadnavis News Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणासाठी सरकारमधील दोन मंत्रीच आमरण उपोषण करणार, मनोज जरांगे पाटील यांचा दावा!

Manoj Jarange Patil claims that the government will initiate a counter-protest in response to the Maratha reservation movement. : सरकारकडून प्रतिआंदोलन उभारण्यामागे आमचे आंदोलन दडपणे हाच हेतू असू शकतो,असा आरोपही त्यांनी केला.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी केलेल्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे कौतुक केले होते. एवढेच नाही तर 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारे साखळी उपोषणही त्यांनी स्थगित केले. एकीकडे सरकार विश्वास दाखवत असतानाच आता जरांगे पाटील यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

आमचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारमधील दोन मंत्री आमरण उपोषण आंदोलन करणार आहेत. या संदर्भात त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यांशी चर्चा देखील झाली आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. जे मंत्री दहा ते बारा दिवस आमरण म्हणजे अन्न, पाणी न घेता एका ठिकाणी बसून उपोषण करणार आहेत, त्यापैकी एकानेच आपल्याला ही माहिती दिली असल्याचेही जरांगे पाटील यांनी माध्यमांना दिली.

मराठा समाजासाठी आम्ही आरक्षण मागतो आहे, आता सरकार मधील मंत्री त्याच मागणीसाठी उपोषण करणार आहे, असेही जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले. सरकारकडून प्रतिआंदोलन उभारण्यामागे आमचे आंदोलन दडपणे हाच हेतू असू शकतो,असा आरोपही त्यांनी केला.

भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमध्ये फेरफार केला जाऊ शकतो, अशी शक्यताही जरांगे पाटील यांनी व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या गुप्त भेटीनंतर असे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घ्यावी, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, असा दावा केला जातोय. या संदर्भात धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेण्यापूर्वी याबाबत सांगायला हवे होते, असेही जरांगे पाटील म्हणाले. सुरेश धस यांनी परस्पर धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने मराठा समाजाचा सुरेश धस यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT