Maratha Reservation Video : मोठी बातमी! मराठा आरक्षणाचा निकाल लांबणीवर, पुन्हा नव्याने होणार...

Maratha Reservation Case to Be Heard Again High Court :मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याच्या संदर्भात सुरू असलेली सुनावणी 60 ते 70 टक्के पूर्ण झाली होती.
Maratha Reservation Hearing
Maratha Reservation HearingSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती बिघडली असतानाच मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठी घडामोड घडली आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या याचिकांवरील सुनावणी पुन्हा नव्याने होणार आहे.

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याच्या संदर्भात सुरू असलेली सुनावणी 60 ते 70 टक्के पूर्ण झाली होती. त्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असते. मात्र, याचिकाकर्त्यांनी पुन्हा पहिल्यापासून सुनावणी घेण्यासंदर्भात तसेच पूर्णपीठ स्थापन करण्याची मागणी केली. ती मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणा संदर्भात पुन्हा पहिल्यापासून सुनावणी सुरू होणार आहे.

Maratha Reservation Hearing
Ahilyanagar Politics : तीन अपर तहसील कार्यालयांचा प्रस्ताव, दडलाय राजकीय हेतू? बाळासाहेब थोरातांनी डागली तोफ

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ज्यांचे पुढे या संदर्भात सुनावणी सुरू होती त्यांची बदली दिल्ली न्यायालयात झाली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली. मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना याचिकाकर्त्यांनी विनंती मान्य केली आहे.

आता मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली पूर्णपीठ स्थापन करून पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यासाठी रजिस्टारकडे नव्याने अर्ज करण्याचे निर्देश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. सुनावणी नव्याने होणार असल्याने या संदर्भातील निकाल देखील लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आणखी काही महिने सुनावणी पूर्ण होऊन निकालाचा वाट पाहावी लागणार आहे.

जरांगेंचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सुरेश धश यांच्या विनंतीवरून त्यांनी सलाईन लावण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मराठा समजाच्या आरक्षणा संदर्भात सरकारने संध्याकाळपर्यंत भूमिका जाहीर करावी अन्यथा दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल, असे जरांगे म्हणाले.

Maratha Reservation Hearing
George the Giant Killer : ....अन् तेव्हापासून जॉर्ज फर्नांडिस यांना 'जॉर्ज द जायंट किलर' म्हणणं सुरू झालं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com