Govind Barge Death Pooja Gaikwad sarkanama
महाराष्ट्र

Beed Crime Video : नर्तिकीच्या नादात जीव गमावला! बीडच्या माजी उपसरपंचाची गोळी झाडून आत्महत्या

Former Deputy Sarpanch Govind Barge Death: माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Roshan More

Crime News : बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसल गावच्या 38 वर्षीय माजी उपसरपंचाचा नर्तिकेच्या घराजवळ गाडीत मृतदेह आढळला. उपसरपंचाने स्वतःच्या कानशिलात गोळी चालवून आत्महत्या केल्याचा संशय आहे. या उपसरपंचाचे नाव गोविंद बर्गे असे आहे. गोविंद बर्गे याच्या मेव्हण्याने पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार पूजा गायकवाड या नर्तिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद बर्गे हे पूजा गायकवडा यांच्यात प्रेमसंबध होते. दीड दोन वर्षापूर्वी थापडीतांडा येथील कलाकेंद्रात गोविंद गेले होते. तेव्हा त्यांची ओळख पूजा हिच्यासोबत झाली होती. ते तिला भेटायला नियमितपणे कलाकेंद्रावर जात होते.

गोविंद यांच्या मेव्हण्याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार, गेवराईचा बंगाल माझ्या नावावर करा आणि पाच एकर जमीन भावाच्या नावावर करा, असा आग्रह पूजा हिने गोविंद यांच्याकडे धरला होता. तसेच मागणी मान्य न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ते गोविंद प्रचंड तणावात होते.

दरम्यान, काही दिवसांपासून पूजा या गोविंद यांच्यासोबत बोलत नव्हत्या. त्यामुळे गोविंद हे पूजाच्या बार्शी तालुक्यातील सासुर या गावी गेले होते. तेथे दोघांमध्ये नेमके काय वाद झाला किंवा काय चर्चा झाली याची माहिती नाही. मात्र, पूजा हिच्या घरापासून काही अंतरावर लाॅक केलेल्या गाडीमध्ये गोविंद यांचा मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर आढळला.

त्यांच्या डोक्याच्या उजव्या भागात कानशि‍लात गोळी लागली होती. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी पोलिस घातपात झाला आहे का? याची शक्यता तपासून पाहत आहे. गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगी नववीमध्ये शिकत आहे तर मुलगा सहावीमध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT