Maharashtra Politics : बापबेट्याच्या भ्रष्टाचारचा नमुना, मनसेचे नेत्याने दाखवला व्हिडिओ; एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे टार्गेट?

Raju Patil Criticized Eknath Shinde Shrikant Shinde : डोंबिवलीतील पलावा पूलावरून मनसे नेते राजू पाटील यांनी भ्रष्टनाथ म्हणत एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना टार्गेट केले आहे.
Eknath Shinde, Shrikant Shinde
Eknath Shinde, Shrikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Raju Patil News : कल्याण शीळ रोडवरील नविन पलावा उड्डाण पुलाचे जुलैमध्ये उदघाट्न होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, उद्घाटनापासून या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या पुलाचे काम निकृष्ट झाल्याची टीका करण्यात येत होती. आता मनसे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू पलामा पुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या व्हिडिओ शेअर केला आहे.

'४ जुलै रोजी उद्घाटन होऊन दोन तासातच खड्डे पडलेला पलावा पुल दोन महिन्यांनंतरही तसाच आहे. हे खड्डे म्हणजे बापबेट्यांच्या भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे.', असा टीका राजू पाटील यांनी केली आहे. बापबेट्याचा उल्लेख करत नाव न घेता पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टार्गेट केले आहे.

पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये भ्रष्टनाथ, बापबेटे, टक्केवारी असे हॅशटॅग वापरत एकनाथ शिंदेंना डिवचले आहे. राजू पाटील यांनी पुलाची पाहणी करत कामाची गुणवत्ता ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे पुलाच्या उद्घटनानंतर निदर्शनास आणून दिले होते. तसेच पुलाच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती.

Eknath Shinde, Shrikant Shinde
Shiv Sena: शिवसेनेत संघटनात्मक मोठे बदल; मनसे स्टाईल नेमणुका

पलावा पूलाच्या कामावरून राजू पाटील यांनी सातत्याने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. काही दिवासंपूर्वीच त्यांनी ट्विट करत पलावा पूल म्हणजे अक्षरशः डोंबाऱ्याचा खेळ झालाय, असा संताप व्यक्त केला होता. तसेच गुणवत्तेच्या नावाने ढोल पिटले.करदात्या जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च तर झाले.पण नेमकं कोणाचा खिसा गरम करायला आणि पुलाची गुणवत्ता कुठे हरवली याचा शोध घेणार का ? या कामाचं ऑडिट होणार का ? जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई होणार का ? असे सवाल केला होता.

Eknath Shinde, Shrikant Shinde
Thane Municipal Election 2025: ठाण्यात जुन्या खेळपट्टीवरच नवा डाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com