Govind Pansare dr Virendra Tawde sarkarnama
महाराष्ट्र

Govind Pansare murder case : मोठी बातमी! कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील संशयित डॉ. वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द!

Govind Pansare murder case suspect dr Virendra Tawde : वीरेंद्र तावडे याला जानेवारी 2018 मध्ये जामीन मंजूर केला होता. मात्र, तावडे याचा जामीन रद्द करावा म्हणून सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला होता.

Roshan More

Govind Pansare murder case : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे यांचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. वीरेंद्र तावडे याला तत्काळ ताब्यात घेण्याचे आदेश एटीएसला न्या. एस.एस.तांबे यांनी दिले आहेत.

वीरेंद्र तावडे याला जानेवारी 2018 मध्ये जामीन मंजूर केला होता. मात्र, तावडे याचा जामीन रद्द करावा म्हणून विशेष सरकारी वकीलाने न्यायालयात युक्तीवाद केला होता. वीरेंद्र तावडे याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचे तसेच जामीन दिल्यास साक्षीदारांवर तावडे दबाव टाकेल, असा युक्तीवाद वकीलांकडून करण्यात येत होता.

गोविंद पानसरे हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडे याच्या सहभागाचे पुरावे एटीएसला मिळाले होते. तेव्हा तावडे हा डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात होता. 2016 मध्ये सीबीआयने तावडेचा ताबा एटीएसकडे दिला. पानसरे यांच्या खून प्रकरणात खुनाचा कट रचने, शस्त्र उपलब्ध करून देणे, हल्लोखोरांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे अशी कामे तावडे यांनी केली होती, असे वकीलांनी न्यायालयात सांगितले.

2018 मध्ये तावडे याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला होता. त्याच्या विरोधात विशेष सरकारी वकीलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने याचा निर्णय जिल्हा कोर्टातच करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार यावर सुनावणी सुरू होती. अखेर सरकरी वकीलांचे म्हणणे मान्य करत कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने तावडे याचा जामीन रद्द करत त्याला तत्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT