Kishor Patil : आमदार किशोर पाटलांची विधानसभेची वाट बिकट?

Kishor Patil politics Mahayuti's leaders will block Kishore Patil political Career : शिवसेना शिंदे गटाचे आमदार पाटील यांना घरच्यांबरोबरच सहकारी नेत्यांनीही दिले आव्हान
Pachora Politics BJP Vs Shiv Sena
Pachora Politics BJP Vs Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Pachora Constituency News : पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील शिवसेना शिंदे गटात गेले. मात्र या निर्णयाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची डोकेदुखी वाढली आहे. या घडामोडींमुळे त्यांची राजकीय कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच मतदारसंघातील महायुतीचे राजकारण लगेचच फिरले आहे. महायुतीचे जे तीन पक्ष एक दिलाने भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्या प्रचारात एकोप्याने काम करीत होते. त्या महायुतीतील तिन्ही पक्षांची तोंडे तीन दिशेला झाली आहेत.

महायुतीचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांना आता विरोधकांपेक्षा स्वकीय अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाकडूनच आव्हान दिले जात आहे. जागावाटप आणि पक्षाकडून उमेदवाराच्या घोषणाची वाट न पाहता या इच्छुकांनी आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आहे.

भारतीय जनता पक्षाचे अमोल शिंदे (Amol Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. महायुतीचे घटक असल्याने या घोषणेने आमदार पाटील यांची वाट बिकट झाली आहे. या नेत्यांची घोषणा प्रत्यक्षात आल्यास पाचोरा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे.

Pachora Politics BJP Vs Shiv Sena
Shirish Chaudhari : “राजकारण सोडेल, पण...”, काँग्रेस आमदार शिरीष चौधरी असं का म्हणाले?

आमदार किशोर पाटील यांनी राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे (ShivsenaUBT) पक्षात फुट पडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने मतदारसंघाचा विकास होईल हे कारण त्यांनी दिले होते. मात्र त्यांचे पक्षांतर आता त्यांनाच अडचणीचे ठरणार असे दिसू लागले आहे.

आमदार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. त्याचे तीव्र पडसाद या मतदारसंघात उमटत आहेत. विशेषतः त्यांच्या कुटुंबातूनच त्याला मोठा विरोध झाला. त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनीच त्यांना पहिले आव्हान दिले.

श्रीमती सूर्यवंशी यांनी आमदार पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाचोरा येथे सभा घेतली. या दौऱ्यातही वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवार म्हणूनच प्रोजेक्ट करण्यात आले होते.

सबंध मतदारसंघात श्रीमती सूर्यवंशी यांनी जोरदार बांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची चुणूक दिसून आली. त्यामुळे आता महायुतीचे आमदार किशोर पाटील विरुद्ध महाविकास आघाडीच्या सूर्यवंशी अशी लढत अपेक्षित होती.

Pachora Politics BJP Vs Shiv Sena
Dada Bhuse On Chhagan Bhujbal : भुजबळांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर दादा भुसेंनी व्यक्त केली नाराजी

आता त्याला नवे राजकीय वळण मिळाले आहे. महायुतीमध्येच तिन्ही घटक पक्षांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये कोणत्याही स्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार पाटील यांना त्याची झळ बसणार आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच आमदार पाटील यांची झोप उडाली आहे. आगामी निवडणुकीसाठी त्यांची वाट बिकट झाली आहे. मतदारसंघात आगामी निवडणुकीत अतिशय चुरशीचे आणि रंजक वातावरण निर्माण होईल असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com