Inspiring victory in gujarat: गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने प्रचंड विजय मिळवत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र या निकालात सर्वाधिक चर्चेत राहिले ते नाव – रमेशभाई भील. तब्बल 28 वर्षे भाजप कार्यालयात पदाधिकारी, नेत्यांना चहा देणारे रमेशभाई आता थेट नगरसेवकपदी विराजमान झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या गृह जिल्हा असलेल्या मेहसाना ( Mehsana) मधील हा निकाल केवळ राजकीय नाही, तर सामान्य कार्यकर्त्यांसाठी मोठी प्रेरणा ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपने या निवडणुकीत अनेक नगरपालिकांवर पुन्हा झेंडा फडकावला आहे.
50 वर्षीय रमेशभाई भील हे मेहसाणा भाजप कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होते. कार्यालयातील नेत्यांना चहा देणे, पाहुणचार करणे आणि दैनंदिन कामे सांभाळणे — हीच त्यांची ओळख होती. पण पक्षनिष्ठा आणि सातत्यपूर्ण सेवेमुळे अखेर भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत वार्ड क्रमांक 13 मधून त्यांना उमेदवारी दिली.
रमेशभाई भील यांनी निवडणुकीत तब्बल 4 हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवत विरोधकांना पाणी पाजलं. पटकावले. विशेष म्हणजे त्यांच्या संपूर्ण पॅनेलनेही मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यामुळे हा विजय केवळ व्यक्तीचा नसून कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा विजय मानला जात आहे.
रमेशभाई भील यांची कहाणी भारतीय राजकारणातील तळागाळातील कार्यकर्त्यांच्या ताकदीचे जिवंत उदाहरण ठरते. साध्या कुटुंबातून आलेल्या रमेशभाईंनी आयुष्यभर मेहनत आणि सेवाभाव जपला — आणि त्याच मेहनतीने त्यांना आता सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.