Maval APMC News: मावळ बाजार समिती बरखास्तीला ब्रेक! मंत्रालयाची स्थगिती; राजकीय लढाईत भाजपची मोठी बाजी

Maval APMC Dismissal Stay Maharashtra: मावळ बाजार समिती बरखास्तीला मंत्रालयातून स्थगिती देण्यात आली आहे. सुनील शेळके विरुद्ध बाळा भेगडे संघर्षात भाजपची मोठी बाजी मारली आहे. मावळच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Maval APMC Dismissal Stay Maharashtra
Maval APMC Dismissal Stay MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

Maval News: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या निर्णयावर अखेर मंत्रालयाने ब्रेक लावला आहे. या स्थगितीमुळे तालुक्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षात भाजपने स्पष्टपणे वरचष्मा मिळवला आहे.

समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल १३ संचालक असतानाही भाजपचे केवळ पाच सदस्य होते. तरीही भाजपचे सुभाष जाधव सभापती झाल्यानंतर संघर्ष टोकाला गेला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे आणि तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या सूचनेनुसार १३ संचालकांनी सामूहिक राजीनामे देत राजकीय खेळी केली.

या घडामोडीनंतर उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेत सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. मात्र, भाजपच्या पाच सदस्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले.

Maval APMC Dismissal Stay Maharashtra
J M Abhyankar News: 14 पत्रांकडे दुर्लक्ष! शिक्षक आमदार अभ्यंकर आक्रमक; शिक्षकांचा संताप उफाळला

न्यायालयाने पणन मंत्र्यांना दोन आठवड्यांत सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी झालेल्या सुनावणीत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बरखास्तीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे.

Maval APMC Dismissal Stay Maharashtra
Mumbai News: विरारमध्ये ‘भाई-डॅडी’ ची गळाभेट! गवळी-ठाकूर फोटो व्हायरल; चर्चांना उधाण

या निर्णयामुळे भाजपने राजकीय डाव साधत सभापती पदावरील पकड अधिक मजबूत केली असून मावळच्या राजकारणात नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे.

"पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, लेखी आदेश अद्याप मिळालेला नाही. तो आदेश आज उशीरा किंवा उद्या मिळू शकतो."

नवनाथ अनपट (सहाय्यक निबंधक)

आजचा दिवस मावळच्या राजकारणाला नवं वळण देणारा ठरला...

आज (ता.२८) उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप, सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांना मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आजचा दिवस मावळच्या राजकारणाला नवं वळण देणारा ठरला. सध्या बाजार समितीचा कारभार प्रशासकांकडे आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे व्यवहार सुरू असले तरी…राजकीय वातावरण मात्र प्रचंड तापलं आहे. हा वाद आता केवळ बाजार समितीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर राष्ट्रवादी vs भाजप प्रतिष्ठेची ही लढाई आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com