Gulabrao Patil & Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Gulabrao Patil : 'आम्ही छप्पर फाड के निवडून आलोय; विजयाचा भगवा त्यांच्या छाताडात...' गुलाबराव पाटलांनी राऊतांना छेडलं

Gulabrao Patil On Sanjay Raut : विधानसभा निवडणूका झाल्या असून शिवसेनेला पराभव अद्याप पचणी पडलेला नाही. शिवसेना शिंदे गटाचा झालेल्या विजयावरून सतत ठाकरे गटाकडून जोरदार टीका होत असते.

Aslam Shanedivan

Buldhana News : राज्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्या असून महायुती सत्तेत आली आहे. तर महाविकास आघाडीचा धुरळा उडाला. सर्वाधिक जागा घेणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. तर 60 जागा जिंकूण आणत एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा आणि तसा कौल जनतेनं दिल्याचे दाखवून दिले होते. पण यानंतरही शिवसेना ठाकरे गटासह खासदार संजय राऊत यांनी गद्दार सेना आणि खोके म्हणत टार्गेट केलं होतं. आता हाच मुद्दा धरत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या विजयावरून राऊतांसह ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, आम्ही असं तसं नाही तर छप्पर फाड के निवडून आलोय. तेही राऊत आणि विरोधकांच्या छाताडात विजयाचा भगवा झेंडा गाडून... असे म्हटलं आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी ही टीका बुलढाण्यात केली आहे.

गुलाबराव पाटील यांनी विधानसभेतील विजयाबद्दल सांगताना शिवसेनेच्या भविष्यावर वाटचालीवर चर्चा केली. तसेच राऊत आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. राऊत आणि त्यांच्याबरोबर काही विरोधक आम्हाला गद्दार म्हणत होते. जे गुवाहाटीला गेले ते पडणार असे म्हणत होते. पण आमच्या लाडक्या बहिणींनी चमत्कार दाखवला आणि 60 निवडूण आलो. आम्ही देशातच गेलो. तुमच्यासारखे थंडी हवा खायला, परदेशात गेलो नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

तसेच गुलाबराव पाटील यांनी राज्यात ज्यावेळी आपत्ती आली त्यावेळी सगळ्यात आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे होते. पण याची माहिती असूनही त्यांना बदनाम करण्याच हे धन्य मानत आहेत, अशीही टीका केली आहे.

महायुतीच्या काळात आपल्या सी क्लास नगरपालिकेत 24 हजार मतदान असतानाही आतापर्यंत 339 कोटी रुपयांचा निधी आला आहे. तर आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही परत येऊ. फक्त आम्ही काम केलं. पण आम्ही असं तसं नाही तर छप्पर फाड के निवडून आलो. तेही जळगावमधील पाचच्या पाच. जे साहेबांबरोबर गेले ते सर्व राऊतांच्या छाताड्यात भगवा झेंडा गाडून निवडून आलेत, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना कोणाची?

सत्तेत येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा सिंचनाचा विषय आम्ही घेतला. ज्या आघाडीने फक्त चार प्रकल्पांना मान्यता दिली. तेथे आम्ही दीडशे प्रकल्पांना मान्यता दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जो जो उठाव केला तो राज्याच्या हितासाठी. याचा मार्ग आम्हाला एकनाथ शिंदे यांनी दाखविला. पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेना दावणीला बांधणीचे काम केले. ते म्हणत असत की आमचा एकही आमदार निवडून येणार नाही. पण आमचे 60 आमदार निवडूण आले. यामुळे बाळासाहेबांची विचार पुढे घेऊन जाणारी खरी शिवसेना कोणाची यावर मतदारांनीच शिक्कामोर्तब केल्याचंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT